Dharma Sangrah

Shravan Wishes In Marathi श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2022 (12:45 IST)
निसर्ग आला बहरून, मनही आलं मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या मन होई पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा...
 
येण्याने तुझ्या मन येई मोहरून
देही जाई शहारून 
सरींनी या मन होई चिंब चिंब
श्रावण येई असा बरसून 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
 
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण 
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
सणासुदीची घेऊन उधळण
आला रे आला हसरा श्रावण!
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
परंपरेचे करूया जतन
आला आहे श्रावण
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
आनंद माझ्या मनात माईना
सृष्टी सजली बदलली दृष्टी 
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
हासत – गात, घेऊन सरींची बरसात 
आला तो मनमोहक माझा श्रावण महिना 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
जरासा हासरा, जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा! 
 
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या 
आला तो श्रावण पुन्हा आला
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर 
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
मराठी परंपरेचा वारसा
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
आकाशी मेघ गरजती, गुंफूनी माळा, मन चिंब भिजवूनी जाई हा मनी वसणारा पावसाळा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
सरीवर सरी येतात आणि मन जातात भिजवून
श्रावण आला सांगतच येतात अगदी धावून  
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
 
श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला 
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा 
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी 
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
श्रावण मासाच्या हिरव्यागार शुभेच्छा!
 
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

अंगारक संकष्टी चतुर्थी उपवासाच्या वेळी या चुका टाळा; आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments