Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावणात काय खरेदी करावं जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (14:31 IST)
श्रावण महिन्याचा पहिला दिवस खूप खास, या 10 गोष्टींपैकी एक आणा, प्रत्येक कामात यश मिळेल
श्रावण महिन्याचा पहिला दिवस खूप विशेष असल्याचे समजलं जातं. हा दिवस अत्यंत शुभ असतो. अशात आज आम्ही आपल्याला 10 वस्तूंबद्दल सांगत आाहोत ज्यापैकी एक वस्तू देखील आपण घेऊन आला तर शुभ फल प्राप्ती होईल.
 
1. त्रिशूळ
त्रिशूळ नेहमी शिवाच्या हातात असतं. हे 3 देव आणि 3 जगाचे प्रतीक आहे. म्हणून, श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा त्रिशूल आणल्याने वर्षभर संकटं तसंच आपत्तींपासून संरक्षण होतं.
 
2. रुद्राक्ष 
सुख, सौभाग्य आणि समृद्धीसाठी तसंच मनाच्या मनाच्या शुद्धतेसाठी घरी मूळ रुद्राक्ष आणा किंवा घरी असलेल्या खर्‍या रुद्राक्षाला चांदीमध्ये मढवून धारण करा. हे आपल्या जीवनासाठी अत्यंत शुभ आणि समृद्धी प्रदान करणारं ठरेल.
 
3. डमरू
हे शिवाचे पवित्र वाद्य आहे. त्याचा पवित्र आवाज सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतं. डमरूचा आवाज आरोग्यासाठीही प्रभावी मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी डमरू आणा आणि श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी एखाद्या मुलाला डमरू भेट द्या.
 
4. चांदीचा नंदी
नंदी हा शिवाचा गण आणि वाहन देखील आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घरात चांदीचा नंदी आणून महिनाभर त्याची पूजा केल्यास आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते.
 
5. पाण्याचे पात्र
शिवाला पाणी खूप प्रिय आहे. जर तुम्हाला हवे असेल तर, श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी, गंगेचे पाणी आणा आणि ते घरात ठेवा आणि महिनाभर पूजा करा, परंतु जर हे शक्य नसेल, तर तुम्ही चांदी, तांबं किंवा पितळेचे पात्र आणून त्यात पवित्र जल भरू शकता. शुद्ध स्वच्छ पाण्याने शिवजींना दररोज अभिषेक करा. धन आगमनासाठीही हा प्रयोग सर्वात प्रभावी आहे.
 
6. चांदीचा सर्प
महादेवाच्या गळ्यात सर्पराज गुंडाळेले असतात. अशात श्रावण महिन्यात पहिल्या दिवशी चांदीच्या नाग-नागिनची जोडी घरात ठेवा, दररोज पूजा करा आणि श्रावणाच्या शेवटल्या दिवशी त्याला एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन ठेवून द्या. हा उपाय पितृ दोष आणि काल सर्प योग यावर प्रभावी आहे.
 
7. चांदीच्या डबीत राख
एखाद्या शिव मंदिरातून भस्म आणून नवीन चांदीच्या डबीत ठेवावं. महिनाभर पूजा करावी आणि नंतर तिजोरीत ठेवून द्यावं. या उपायाने घरात भरभराटी येते.
 
8. चांदीचा कडा 
भगवान शिव पायात चांदीचा कडा धारण करतात. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी कडा आणण्याने तीर्थ यात्रा तसंच परदेश प्रवासाचे योग बनतात.
 
9. चांदीचा चंद्र किंवा मोती
भगवान शिवाच्या मस्तकावर चंद्र विराजित आहे. म्हणून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचे चंद्र देव आणून किंवा खरा मोती आणून त्यांची पूजा करावी. मोती चंद्र ग्रहाची शांती करतं. हा उपाय केल्याने चंद्र ग्रहाची शातीसह मन मजबूत होतं. आपण पेंडेटमध्ये चंद्र आणि मोती सोबत धारण करु शकता.
 
10. चांदीचा बिल्व पत्र
श्रावण महिन्यात महादेवाला बिल्व पत्र अर्पित केले जातात. अनेकदा शुद्ध अखंडित बिल्वपत्र मिळणे शक्य नाही. अशात चांदीचं बेलपत्र आणून दररोज शिवाला अर्पित करुन अनेक कोटी पापांचा नाश होतो आणि घरात शुभ कार्यांचा संयोग बनतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments