Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BBC ISWOTY 2022 : विजेती कोण? आज होणार घोषणा

Webdunia
रविवार, 5 मार्च 2023 (10:56 IST)
बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2022 या पुरस्काराची घोषणा आज (5 मार्च) केली जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची यंदाची ही चौथी आवृत्ती आहे. बीबीसी ISWOTY पुरस्कारासाठी ज्युरींनी फेब्रुवारी महिन्यात 5 महिला खेळाडूंना नामांकन दिलं होतं. यामध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू, कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि बॉक्सर निखत जरीन यांचा समावेश आहे.
 
नामांकन मिळालेल्या प्रत्येक खेळाडूने त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय असं यश मिळवलेलं आहे.
 
बीबीसी ISWOTY पुरस्कारासाठी लोकांकडून मतदान घेण्यात येतं. त्यासाठीची मुदत 6 ते 21 फेब्रुवारीदरम्यान देण्यात आली होती.
लोक आपल्या आवडत्या खेळाडूंना मतदान करतात. अखेरीस, सर्वाधिक मते मिळवणाऱ्या खेळाडूला विजेता म्हणून घोषित करण्यात येतं.
 
यापूर्वी, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू(2019), बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी (2020) आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू (2021) यांनी भारतीय स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर पुरस्कार पटकावलेला आहे. आता 2022 चा पुरस्कार कोण जिंकतं, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
 
बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर पुरस्काराचं प्रमुख उद्दीष्ट हे सर्व क्षेत्रातील महिला खेळाडूंच्या कामगिरीवर प्रकाश टाकणे आहे. त्याशिवाय, महिला खेळाडूंच्या समस्या त्यांच्यासमोरील आव्हाने यांच्याकडेही या माध्यमातून लक्ष वेधण्यात येतं.
 
जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या महिलांवर लक्ष केंद्रित करण्यासंदर्भात बीबीसीच्या वचनबद्धतेचाही हा एक भाग आहे.
 
याव्यतिरिक्त बीबीसी क्रीडा क्षेत्रातील दिग्गज महिला खेळाडूंना त्यांच्या कामगिरीसाठी लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारही प्रदान करतं.
 
धावपटू पीटी उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज हे आजपर्यंत जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
 
सर्वच क्षेत्रातील विविधता आणि सर्वसमावेशकतेसाठी बीबीसी वचनबद्ध आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पुरस्कार अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी आम्ही या आवृत्तीत बीबीसी इंडियन पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे.
 
नामाकंन मिळालेल्या खेळाडूंची थोडक्यात ओळख;
 
मीराबाई चानू
वेटलिफ्टिंग चॅम्पियन साईखोम मीराबाई चानू हिने क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. 2021 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला वेटलिफ्टर ठरलीय.
2022 च्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत तिने रजत पदक जिंकलं तर त्याच वर्षी बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावलं.
 
2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाई निर्धारित भार उचलण्यात अपयशी ठरली होती आणि तिने जवळपास या खेळाला अलविदा केला होता.
 
पण 2017 साली जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णवेध घेतला.
 
मणिपूरमध्ये जन्माला आलेल्या मीराबाईचे पालक चहा विक्रेते होते. आपल्या क्रीडा कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने अनेक अडथळे पाहिले.
 
पण या सगळ्यांवर मात करत तिने ऑलिम्पिक पदकापर्यंतचा पल्ला गाठला. मीराबाई चानूने 2021 साली बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला होता.
 
साक्षी मलिक
2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत या साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. 58 किलो वजनीगटात तिने कांस्यपदक जिंकलं होतं.
ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती चौथी भारतीय महिला खेळाडू होती. साक्षीला पहिल्यापासून खेळात रस होता आणि आपल्या पैलवान आजोबांकडून तिला प्रेरणा मिळाली.
 
रिओ ऑलिम्पिकमधील यशानंतर साक्षीच्या कारकीर्दीला ओहोटी लागली, पण 2022 साली बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत तिने जोरदार पुनरागमन केलं.
 
साक्षी मलिकने त्यापूर्वीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रजत आणि कांस्यपदक जिंकलं होतं.
 
विनेश फोगाट
कुस्तीत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन पदकं जिंकणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय महिला आहे. कॉमनवेल्थ आणि आशियाड खेळांमध्ये सुवर्ण जिंकणारीही ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
 
लागोपाठच्या तीन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये विविध वजनी गटांमध्ये तिच्या नावावर सुवर्णपदकं आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये 53 किलो वजनी गटात तिने आपलं शेवटचं सुवर्णपदक जिंकलं.
 
विनेशचं अख्खं कुटुंब कुस्तीत आहे म्हटलं तर वावगं ठरु नये.तिच्या चुलत बहिणी गीता आणि बबिता यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत.
 
पी. व्ही. सिंधू
बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधू ही ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वैयक्तिक पदकं पटकावणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू आहे.
टोकियोमध्ये जिंकलेलं कांस्यपदक तिचं दुसरं ऑलिम्पिक मेडल ठरलं, 2016 साली रिओमध्ये जिंकलेलं रजत पदक तिचं पहिलं मेडल होतं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिने सुवर्णपदक जिंकलं.
 
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (BWF) वर्ल्ड टूर फायनल्स 2021 मध्ये सिंधूने रजत पदक जिंकलं होतं. 2019 साली वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकत सिंधूने इतिहास रचला होता. वयाच्या 17 व्या वर्षी 2012 साली तिने BWF च्या क्रमवारीत पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं होतं.
 
सिंधू 2019 साली पहिल्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्काराची मानकरी ठरली होती.
 
निखत झरीन
2011 साली ज्युनिअर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या निखतने 2022 साली जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा खिताब आपल्या नावावर केला.
 
2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत निखतने फ्लायवेट गटात सुवर्णपदक जिंकलं. 2022 साली भारतातील नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्णपदक जिंकलं.
आपल्या मुलीने तिची ऊर्जा योग्य ठिकाणी लावावी या विचाराने निखतच्या वडिलांनी तिला क्रीडा जगताची ओळख करून दिली.
 
वयाच्या बाराव्या वर्षी एका सामन्यादरम्यान निखतचा डोळा सुजला, नातेवाईकांनीही तिचं लग्न कसं होईल असे टोमणे मारले, पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निखतच्या वडिलांनी तिला आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तेव्हापासून तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

लेबनॉनमध्ये सहा इस्रायली सैनिक ठार,IDF लष्करी मुख्यालयावर हल्ला

Chandrashekhar Bawankule Profileचंद्रशेखर बावनकुळे प्रोफाईल

Milind Deora Profile मिलिंद देवरा प्रोफाइल

Aaditya Thackeray Profileआदित्य ठाकरे प्रोफाइल

Chhagan Bhujbal Profile छगन भुजबळ प्रोफाइल

पुढील लेख
Show comments