Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या घरी पाळणा हलणार ,ख्रिस्तियानो रोनाल्डो ने जुळ्या मुलांचा वडील होण्याची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली

Webdunia
शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (13:59 IST)
मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गुरुवारी इंस्टाग्रामवर घोषणा केली की तो त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत दोन मुलांचे वडील  होणार आहे. रोनाल्डोने पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, “आम्ही जुळ्या मुलांचे पालक होणार आहोत हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. आम्ही आपल्या भेटीसाठी थांबू शकत नाही.' पोस्टच्या दुसऱ्या चित्रात, रोनाल्डो त्याच्या चार मुलांसह स्विमिंग पूलमध्ये होते .

या दोघांपैकी पहिली मुलगी आहे. तिचे नाव अलाना असून ती तीन वर्षांची आहे. रोनाल्डोला 11 वर्षांचा मुलगा देखील आहे, त्याचे नाव ख्रिस्तियानो ज्युनियर आहे. याशिवाय त्यांना चार वर्षांची जुळी मुलं इवा आणि मॅटिओ आहेत. 36 वर्षीय रोनाल्डोने या हंगामाच्या सुरुवातीला इटालियन क्लब जुव्हेंटस सोडून मँचेस्टर युनायटेडमध्ये प्रवेश केला. त्याने मँचेस्टर युनायटेडसाठी शानदार पुनरागमन केले. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. या हंगामाच्या  सुरुवातीलाच त्याने हा विक्रम केला होता.
रोनाल्डोला प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कठीण काळ जात आहे. रोनाल्डो त्या संघाचा भाग होता ज्याने ओल्ड ट्रॅफर्ड येथे कट्टर प्रतिस्पर्धी लिव्हरपूलकडून 0-5 असा पराभव केला. रोनाल्डोने रिअल माद्रिदसाठी 4 चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावले आहे. मँचेस्टर युनायटेडसाठी त्याने एकदाच हे विजेतेपद पटकावले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments