Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रॉजर फेडरर विजेता

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2018 (11:29 IST)
रॉजर फेडरर याने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मारिन सिलिचला 6-2, 6-7, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये पराभूत केले. रॉजर फेडररने सलग दुसर्‍यांदा आणि एकूण सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले. गेल्यावर्षीही फेडररने सिलिचला हरवूनच हे विजेतेपद जिंकले होते. 
 
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि क्रोएशियाचा सिलिक हे दोघेही आतापर्यंत दहावेळा प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर आले आहेत. या 10 पैकी 9 वेळा रॉजर फेडरर विजयी झाला आहे. तर एकदा सिलिक विजयी झाला आहे. सिलिकने 2014 मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता. रॉजर फेडरर आणि दक्षिण कोरियाचा खेळाडू हेयॉन चुंग यांच्यात सेमी फायनल रंगली होती.
 
हेयॉन चुंग उपांत्य फेरीत दमदार खेळी करु शकला नव्हता, त्याच्यामुळे त्याला नमवून फेडररने अंतिम फेरीत धडक मारली होती. सेमी फायनलमध्ये चुंगच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी धाडण्यात आले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदाल आणि स्टॉन वावरिंका हे खेळाडू दुखापतीमुळे भाग घेऊ शकले नाहीत. तसेच अ‍ॅण्डी मरेने या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments