Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Masters Table Tennis: मास्टर्स टेबल टेनिस खेळण्यासाठी पोहोचलेल्या अरुण सिंगचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Webdunia
बुधवार, 26 एप्रिल 2023 (15:21 IST)
राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी आलेले जागतिक मास्टर्स टेबल टेनिस 2023 मध्ये कांस्यपदक जिंकणारा राजस्थानचा अनुभवी टेबल टेनिसपटू अरुण सिंग यांचे येथे निधन झाले. या स्पर्धेत ते राजस्थान संघासोबत खेळण्यासाठी आले होते. ते रविवारी  हॉटेलमध्ये पोहोचले  आणि संध्याकाळी चॅम्पियनशिपच्या ठिकाणी रवाना होणार होते , परंतु त्याचे सहकारी त्याला घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला नाही. 
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने दार उघडल्यावर अरुण यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण प्राणघातक हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अध्यक्षा मेघना अहलावत यांनी अरुण सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने नॅशनल मास्टर्स टेबल टेनिसमध्ये अनेक विजेतेपद पटकावले होते.गतिक 'व्हेटरन्स' चॅम्पियनशिप (2023) कांस्यपदक विजेते अरुण सिंग बरहत यांचे 29 व्या मास्टर्स राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी येथे पोहोचल्यानंतर निधन झाले.
 
 त्यांच्या पश्चात मुलगी आत्मिका, जावई आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी जोधपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
अरुण सिंग हे टेबल टेनिसचे उत्साही खेळाडू होते आणि त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.ते नियमितपणे राष्ट्रीय 'वेटरन्स' चॅम्पियनशिपमध्ये खेळले . जिथे त्यांनी अनेक पदके जिंकली. गतवर्षी श्रीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी  पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
 
TTFI (टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया) च्या अध्यक्षा मेघना अहलावत यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.
 
“मी त्याच्या खेळाबद्दलचे समर्पण आणि आवड याबद्दल बरेच ऐकले आहे. बंधुवर्गातील लोक त्याच्या प्रतिभेचे व कर्तृत्वाचे कौतुक करायचे. टेबल टेनिसच्या कुटुंबासाठी, विशेषत: त्यांच्या कुटुंबासाठी हे खूप मोठे नुकसान आहे.

Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मृत लोकांची नावे अजूनही मतदार यादीत, जिवंत लोकांची नावे गायब-केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उपस्थित केला मुद्दा

धुळ्यामध्ये 10 हजार किलोहून अधिक चांदी जप्त

महाराष्ट्रात बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची कारवाई, एफआयआर दाखल

Mahrashtra Exit Polls : महाराष्ट्रात महायुती की एमव्हीए? एक्झिट पोलनंतर गोंधळ वाढला

Balasaheb Shinde Died: बीडचे उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments