Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपद

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपद
नवी दिल्ली , सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (10:32 IST)
अमेरिकेच्या बेईवेन झांग हिने तीन गेमच्या कडव्या  संघर्षानंतर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 
झांग हिने अंतिम सामन्यात सिंधूचा 21-18, 11-21, 22-20 अशा संघर्षानंतर पराभव केला. झांगने पहिला सेट कडव्या संघर्षानंतर जिंकला. त्यानंतरचा सेट सिंधूने जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. निर्णायक सेटस्‌मध्ये झांगने सिंधूवर दोन गुणाने मात केली.
 
तत्पूर्वी सिंधूने जागतिक विजेती व जगात तिसर्‍यास्थानी असलेल्या धाईच वॅटचानोक इंटानोन हिचा 21-13, 21-15 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
 
अंतिम लढत फारच अटीतटीची ठरली. सिंधूने अनेक संधी वाया दवडल्या तशा मॅचपॉईंटच संधी वाया घालवल्या. त्याचा लाभ झांगला मिळाला. चित्तथरारक असे तीन गेम झाले. शेवटी झांगने बाजी मारली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेची भाजपवर जोरदार टीका काश्मिरातून सत्तेतून बाहेर पडा