Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रद्द

भारतात होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रद्द
नवी दिल्ली , गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (15:08 IST)
भारतात 2021 मध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोरोना संसर्गाच्या साथीमुळे रद्द करण्यात आली आहे. आता 2022 मध्ये होणार्याध या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे.
 
कोरोना संसर्गाच्या स्थितीचा जगभरातील आढावा घेण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) हा निर्णय घेतला आहे. वास्तविक कुमारी विश्वचषक स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात होणार होती. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा 2021 मध्ये फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती पाहता आणखी काही काळ विश्वचषक लांबवणे योग्य होणार नसल्याचे ‘फिफा'ने स्पष्ट केले. भारताला 2022 मधील कुमारी विश्वचषक फुटबॉलचे यजमानपद देण्यात आले आहे. कोस्टा रिकाला 2022 मध्येच होणार्याम 20 वर्षांखालील महिला विश्वचषकाचा मान देण्यात आला आहे, असे ‘फिफा'ने स्पष्ट केले.
 
भारताने याआधी 2017 मध्ये कुमारांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन पाहून कुमारींच्या विश्वचषकाचे जानपद भारताला देण्याचा निर्णय ‘फिफा'ने घेतला होता.
 
यजमानपद भारताकडे असल्याने भारताच्या कुमारी संघाचा या स्पर्धेत सहभाग निश्चित होता. देशातील पाच ठिकाणे त्यासाठी निवडण्यात आली होती. नवी मुंबई, भुवनेश्वर, कोलकाता, गुवाहाटी, अहमदाबाद येथे ही स्पर्धा 2021 मध्ये खेळण्यात येणार होती.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ जाणार इंग्लंडच्या दौर्यांवर