Dharma Sangrah

आता CBSE दहावी आणि बारावीची परीक्षा डिजीटल अ‍ॅडमिट कार्डाने होणार, डाऊनलोड चे नियम जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 7 डिसेंबर 2020 (18:07 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता CBSE ने यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी डिजीटल अ‍ॅडमिट कार्ड (Digital Admit Card) देण्याचा निर्णय घेतला आहे. आता विध्यार्थ्यांना या प्रवेश पत्रावर किंवा अ‍ॅडमिट कार्डावर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीसाठी शाळेच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
 
केंद्रीय मंत्री डॉ.रमेश पोखरियाल 'निशंक' म्हणाले की यंदाच्या वर्षी चढ-उतार असून देखील उत्तम इच्छा शक्तीने वेळेवर निकाल जाहीर करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे, जेणे करून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया ना जावो. तसेच ते म्हणाले की कोरोनाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम देखील सुरूच राहणार. 
 
 
 
अशा प्रकारे डिजीटल प्रवेश पत्र डाउनलोड करावे - 
 
सीबीएसईच्या मान्यताप्राप्त असलेल्या शाळांच्या लॉग इन वर हे डिजीटल प्रवेश पत्र पाठविण्यात येईल. 
10 वी आणि 12वी चे विद्यार्थी शाळेच्या अधिकृत संकेत स्थळावरून हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या डिजीटल प्रवेश पत्रावर शाळेच्या मुख्याध्यापकांची डिजीटल स्वाक्षरी असेल. तसेच विध्यार्थ्यांच्या पालकांना देखील या अ‍ॅडमिट कार्डावर स्वाक्षरी करावी लागणार. शाळेकडून सर्व विध्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खास यूजर आणि पासवर्ड देण्यात येईल. ज्याच्या मदतीने विध्यार्थी आपले अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतील. या प्रवेश पत्रावर कोरोनाचा संसर्ग रोखण्याविषयाची माहिती पुरविली जाईल. या मध्ये हे सांगण्यात येणार की विध्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवायचे आहे. विध्यार्थ्यांना मास्क आणि हॅन्ड सेनेटाईझर आवर्जून बाळगायचे आहे. मात्र अ‍ॅडमिट कार्डाची हार्डकॉपी विध्यार्थ्यांना आपल्या जवळ बाळगायची आहे. परीक्षा केंद्रावर याच कार्डाच्या साहाय्याने प्रवेश देण्यात येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री गिरीश महाजन यांना एका महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले

पंतप्रधान मोदींवरील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे समर्थन, म्हणाले -

प्रपोजलच्या नावाखाली क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या—प्रेयसीने प्रियकराला बांधून जिवंत जाळले, घटनेचा व्हिडिओही काढला

मंत्री गिरीश महाजन यांना एका महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले, व्हिडीओ व्हायरल

एकनाथ शिंदे यांनी पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शाहच्या कुटुंबीयांना दिलेले शब्द पाळले

पुढील लेख