Festival Posters

EPFO: तुमच्याकडे पीएफ खात्याचा UAN नंबर आहे? नसल्यास, घरी बसून हे जेनरेट करा

Webdunia
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (10:45 IST)
जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) चे सदस्य असाल आणि तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्षम करू शकला नसेल तर, तुम्ही येथे दिलेल्या 7 चरणांचे अनुसरणं करून तुमचा यूएएन नंबर जेनरेट करू शकता. त्याआधी, यूएएन सक्रिय केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल हे जाणून घ्या.
 
UAN नंबरचे फायदे
- आपण यूएएन वापरून आपल्या पीएफ खात्यावर नजर ठेवू शकता.
- आपल्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ खाते असल्यास आपण यूएएन वापरून आपल्या सर्व खात्यांचा तपशील एका ठिकाणी पाहू शकता.
- आपण यूएएन मार्फत आपले पीएफ खाते पासबुक ऑनलाइन तपासू शकता.
- आपण आपल्या खात्यातून यूएएनमार्फत काही पैसे काढू शकता.
- यूएएन च्या माध्यमातून आपण एका खात्यातून दुसर्‍या खात्यात रक्कम हस्तांतरित करू शकता
 
आपण घरी आपला यूएएन नंबर जेनरेट करू शकता.
- सर्व प्रथम, आपण ईपीएफओ www.epfindia.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- त्यानंतर ‘Our Services’ निवडा आणि ‘For Employees’ वर क्लिक करा.
- यानंतर, वापरकर्त्याने ‘Member UAN/ Online Services’ वर क्लिक करावे लागेल
- मग ‘Activate Your UAN’ (Important Links च्या खाली तो उजवीकडे उपस्थित असेल).वर क्लिक करा.
- आता आपली वैयक्तिक माहिती जसे यूएएन, नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ‘Get Authorization Pin’ वर क्लिक करा.
- OTP आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल. तुम्हाला ‘I Agree’ वर क्लिक करून OTPला एंटर दाबा
- शेवटी ‘Validate OTP and Activate UAN’ वर क्लिक करा.
 
तुम्हाला भारत सरकारच्या UMANG अॅपवर पीएफ खात्याशी संबंधित डिटेल्सही मिळेल. हा अ‍ॅप वापरून कर्मचारी त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) देखील सक्रिय करू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मदत साहित्य घेऊन जाणारे विमान तलावात कोसळले, दोघांचा मृत्यू

LIVE: वणीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकतेची झलक; एकत्र महापालिका निवडणुका लढवणार

श्रीलंका मालिकेपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या घरावर गोळीबार

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध Jawaharlal Nehru Essay 2025

इस्लामाबाद उच्च न्यायालयाजवळ स्फोट 12 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments