Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fake banking apps: आपल्या मोबाईल फोन मध्ये असे अॅप तर नाही त्वरितच तपासा, अन्यथा बँक खाते खाली होईल

Fake banking apps: आपल्या मोबाईल फोन मध्ये असे अॅप तर नाही त्वरितच तपासा  अन्यथा बँक खाते खाली होईल
Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:06 IST)
सध्याच्या काळात सायबर फ्रॉड होऊन बँक खाते रिकामे झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
Fake banking apps: मुळे लोकांच्या खात्यातून सर्व ठेवलेली रकम  गायब होत आहेत. आपल्या फोनमध्ये तर अशी कोणतेही अॅप इन्स्टॉल केलेली तर नाही तपासून घ्या की, हे अॅप बनावट आहे की नाही.
 
आपण स्मार्टफोन वापरता का? तर ही आपल्यासाठी कामाची बातमी आहे. आजच्या काळात ज्या पद्धतीने डिजिटल बँकिंग (Digital Banking)झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्यासाठी आपले पैसे सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे झाले आहे. यासह, कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, आपण ते बनावट आहे की नाही हे व्यवस्थित तपासून घ्यावे.अनेक बनावट बँकिंग अॅप्समुळे लोकांच्या खात्यातून सर्व ठेवी गायब होत आहेत. या व्यतिरिक्त, कोणत्याही लिंक वर क्लिक करण्यापूर्वी, आपल्याला त्याबद्दल त्याची  माहिती असणे आवश्यक आहे. बनावट बँकिंग अॅप्सबद्दल(Fake banking apps) आपण कसे शोधू शकता ते जाणून घेऊ या.
 
बनावट अॅप मुळे खाते रिकामे केले जाईल,
सध्या  फसवे बँकिंग अॅप्स फसवणुकीचे साधन बनले आहेत. हे बनावट  अॅप्स अगदी वास्तविक अॅप्ससारखे दिसतात आणि युजर्स त्यांच्या जाळ्यात अडकतात, ज्यामुळे त्यांच्या खात्यातून सर्व पैसे गायब होतात. म्हणून, अशा फसवणुकीला टाळण्यासाठी, बनावट अॅपबद्दल शोधणे फार महत्वाचे आहे.
 
बँकिंग आयडी-पासवर्डवर नजर ठेवणे
सायबर गुन्हेगार बनावट बँकिंग अॅप्सद्वारे लोकांचा गोपनीय डेटा किंवा ऑनलाइन बँकिंग आयडी-पासवर्ड इत्यादींवर नजर ठेवतात आणि नंतर आपल्या बँक खात्यात ठेवलेले  सर्व पैसे काढतात. या व्यतिरिक्त, आपल्या सीव्हीव्ही, पिन आणि खाते क्रमांकाचा तपशील कोणाशीही शेअर करू नका.
 
आपले  बँकिंग खाते सुरक्षित कसे ठेऊ शकता (How to keep your bank account safe)  
कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडून आलेल्या  अॅपला इन्स्टॉल करू नका.नेहमी सत्यापित अॅप नेहमी Google Play Store वरून डाउनलोड करा.असं  केल्याने फसवणुकीची शक्यता बरीच कमी होते. 
 
बनावट बँकिंग अॅप्स कसे ओळखावे
1 बनावट बँकिंग अॅप्स आपल्या  मोबाईलची बॅटरी खूप लवकर संपवतात. या व्यतिरिक्त, जर आपला  मोबाईल फोन नवीन आहे  पण थोड्या वेळात बॅटरी वारंवार संपत असेल तर ते मोबाईलमध्ये मालवेअर किंवा व्हायरसचे लक्षण असू शकतात. 
 
2 कोणतेही अॅप डाउनलोड करताना त्या अॅपच्या शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. जर आपल्याला  त्या शुद्धलेखनात काही चूक आढळली तर या प्रकारचे अॅप डाउनलोड करणे टाळा. जर अॅपच्या नावाने कोणत्याही कॅरेक्टरचे स्पेलिंग चुकीचे असेल तर ते बनावट अॅप आहे हे समजून घ्या. जर आपण असे अॅप डाऊनलोड केले तर आपल्या  खात्यातून सर्व पैसे उडवले जाऊ शकतात. 
 
3 अॅप डाउनलोड करताना, हे देखील लक्षात ठेवा की ते अॅप किती वेळा डाउनलोड केले गेले आहे. खरं तर, जर आपल्याला एकाच नावाची अनेक अॅप्स दिसली तर त्यांच्या डाउनलोडवर आवर्जून नजर टाका कारण त्यामुळे खरे आणि बनावट अॅप  देखील ओळखू शकतो.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

टीम इंडियाचे स्टार खेळाडू केएल राहुल एका गोंडस मुलीचे बाबा झाले

नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरांचे बुलडोझर पाडण्यास बंदी, न्यायालयाने प्रशासनाला फटकारले

LIVE: नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरांचे बुलडोझर पाडण्यास बंदी

नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडले

बोईंगने भारतात 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

पुढील लेख
Show comments