Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, Google घरी बसल्या पैसे मिळविण्याची संधी देतं

काय सांगता, Google घरी बसल्या पैसे मिळविण्याची संधी देतं
, शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (11:19 IST)
प्रत्येकाला घरी बसून पैसे कमावायचे असतात. पण प्रश्न असा आहे की ही संधी कशी मिळणार ? आज आम्ही आपल्याला पैसे कसे कमावायचे आहे ते सांगत आहोत.  भारतात गूगल टास्क मॅट अ‍ॅप सुरू करणार आहे. कंपनीने त्याची चाचणी सुरू केली आहे. आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये या अ‍ॅपचा वापर करून पैसे कमावू शकता. सध्याच्या या काळात हे अप्लिकेशन बीटा चाचणीत आहे आणि विशिष्ट रेफरल कोडमुळे काही निवडकांसाठी मर्यादित आहे. 

या अ‍ॅपला आपण गूगलच्या प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता. पैसे कमाविण्यासाठी आपल्याला स्मार्टफोनचा वापर करून काही सोपे कामे पूर्ण करावे लागतील. जसे की एखाद्या रेस्टोरेंटचे फोटो काढणे, सर्वेक्षण प्रश्नांची उत्तरे देणे. इंग्रेजी मधून दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे इत्यादी. 
 
या साठी आपल्याला स्मार्टफोनवर गूगल टास्क मॅट अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार. अ‍ॅपचा वापर करून आपल्याला हे शोधावे लागेल की जवळपास कोणता टास्क आहे. नंतर हे टास्क पूर्ण करावे लागेल. हे काम पूर्ण केल्यावर आपल्याला पैसे मिळतील. 
 
गूगल ने या टास्कला या 2 दोन श्रेणीत वाटले आहे. पहिले सिटिंग टास्क आणि दुसरे फील्ड टास्क. या अ‍ॅप मध्ये यूजरची रँकिंग, त्यांनी किती टास्क पूर्ण केले आहे. कोणते काम बरोबर केले आहे, तो कोणत्या लेव्हलला आहे हे दिसते. 
 
सिटिंग टास्क मध्ये आपल्याला घरात बसून काम करण्याची परवानगी असेल. या कामासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. आपण घरात बसून देखील आपल्या स्मार्टफोनच्या साहाय्याने हे काम पूर्ण करू शकता. पण फील्ड टास्क साठी आपल्याला जवळपास जावे लागते. या कामात आपल्याला चित्र काढणे, मॅपिंग बद्दलची माहिती देणे इत्यादी आहे.गूगल टास्क मॅट अ‍ॅपच्या संदर्भात 3 गोष्टी आहे ज्यामुळे ह्याचा कार्याचे मूल्यांकन केले जाऊ शकते. 
 
* पहिले असे की अ‍ॅपचा वापर करून जवळपासचे कार्य शोधणे.
* मिळकत सुरू करण्यासाठी दिलेल्या कामाला वेळेत पूर्ण करणे.
* मिळकत मिळविण्यासाठी एकदा कॅश आउट करणे. 
सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की यूजरला एखादे काम करण्यात स्वारस्य नसेल तर तो या कामाला सोडू शकतो आणि दुसरे काम निवडून पुढे वाढू शकतो.
    
पेमेंट कसे दिले जाईल -
यूजर सहजपणे या अ‍ॅपचा वापर करून कमावू शकतात. अहवालानुसार, काम पूर्ण केल्यावर यूजरला स्थानिक चलनाच्यानुसार पैसे दिले जातील. टास्क मॅट अ‍ॅप वरून कमावण्यासाठी यूजरला थर्ड पार्टी प्रोसेसरशी बँक खाते लिंक करावे लागेल. कामाने मिळविलेल्या मिळकती मधून पैसे काढण्यासाठी यूजरला आपल्या ई- वॉलेट किंवा खात्याचा तपशीलला गूगल टास्क मॅट अ‍ॅपच्या पेमेंट पार्टनर सह नोंदवावे लागेल. यासह आपल्या प्रोफाइल पेजवर जाऊन कॅश आउट पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता आपण आपले पैसे सहजपणे काढू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Flipkartची Big Saving Days Sale आजपासून सुरू होत आहे, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसह या उत्पादनांवर 40-70% सूट