Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता,आता JioPages टीव्ही मध्ये देखील बघू शकतो

What
Webdunia
गुरूवार, 18 मार्च 2021 (19:53 IST)
जिओ पेजेस ब्राउझर अँड्रॉइड टीव्हीच्या गुगल प्ले स्टोअरवर लाँच करण्यात आला आहे. हा वेब ब्राउझर खासकरुन टीव्हीसाठी डिझाइन केलेला पहिला मेड इन इंडिया ब्राउझर आहे.
पूर्वी जिओ पेज केवळ जिओच्या सेटअप बॉक्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होता, परंतु आता ते प्रत्येक अँड्रॉइड टीव्हीवर उपस्थित असेल. यात वापरकर्त्यांना क्युरेटेड व्हिडिओ कन्टेन्ट सेक्शन मिळेल.या मध्ये आपण 20 केटेगरी पैकी 10,000 व्हिडिओ पाहू शकता.
JioPages चा फायदा हा आहे की तो वापरकर्त्यांना इतर ब्राउझरच्या तुलनेत डेटा गोपनीयतेसह(प्रायव्हेसीसह) त्यांच्या डेटावर संपूर्ण नियंत्रण देतो.
भारतीय भाषांमध्ये काम करण्याच्या क्षमतेमुळे इंग्रजी व्यतिरिक्त त्याला स्वदेशी असे म्हटले जाते. JioPages हिंदी, मराठी, तामिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भारतीय भाषांना पूर्णपणे सपोर्ट करतो. यात एक इंटिग्रेटेड डाउनलोड मॅनेजर देखील असेल या मधून आपण आपले डाउनलोड डेटा, बुकमार्क,हिस्ट्री मॅनेजमेंट टॅब ऍक्सेस करू शकतो. 
पर्सनलाइझ्ड होम स्क्रीन,पर्सनलाइझ्ड थीम,पर्सनलाइझ्ड कॉन्टेन्ट , इंफार्मेटिव्ह कार्ड्स, भारतीय भाषेचे कन्टेन्ट एडव्हान्स डाउनलोड मॅनेजर,इन्कॉग्निटो मोड आणि ऍड ब्लॉकर सारखी वैशिष्ट्ये देखील ग्राहकांना JioPages मध्ये  मिळणार आहे.  
अँड्राईड टीव्हीवर असं करावे डाउनलोड -
आपल्या अँड्रॉइड टीव्हीवर आपण Google Play वर जाऊन JioPages डाउनलोड करू शकता. JioPages टीव्ही च्या मोबाईल व्हर्जन वर काही फरक करण्यासाठी JioPages टीव्ही टायटल म्हणून अप उपलब्ध आहे. सेटअप बॉक्स युजर्सला वेब ब्राउजिंग अनुभव देण्यासाठी हे jio सेटअप बॉक्स साठी देखील उपलब्ध केले आहे  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सोलापूर : सांगोला तालुक्यात गर्भवती महिलेने केली आत्महत्या

Rani Durgavati Information गोंडवानाची वीरांगना राणी दुर्गावती

UPSC 2024 Result: UPSC CSE अंतिम निकाल जाहीर, प्रयागराजचे शक्ती दुबे देशात अव्वल

लातूर : न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्याला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली

मुंबई : विक्रोळी पूर्व भागात महिलेची गळा चिरून हत्या

पुढील लेख
Show comments