Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुकवरून तुमचा फोन नंबर, ईमेल 'लीक' झालाय का? कसं तपासून पाहाल?

Webdunia
बुधवार, 7 एप्रिल 2021 (19:49 IST)
गेल्या काही काळात झालेल्या फेसबुक डेटा ब्रीच (Facebook Data Breach) म्हणजे फेसबुकवरून युजर्सची माहिती गहाळ होण्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये तुमचीही माहिती पसरली का, हे तुम्ही आता तपासून पाहू शकता.
 
जवळपास 53 कोटींपेक्षा जास्त लोकांचे तपशील लीक झाल्याचं एका ऑनलाईन डेटाबेसमध्ये आढळून आलं. यामध्ये बहुतेकजणांच्या मोबाईल नंबर्सचा समावेश आहे.
 
तुमचा फोन नंबर किंवा ईमल आयडी जगजाहीर झालाय का, हे तुम्ही देखील तपासून पाहू शकता. त्यासाठी Have I Been Pwned या ऑनलाईन टूलचा वापर करता येईल.
 
2019मध्ये झालेल्या एका घुसखोरी - ब्रीच दरम्यान गहाळ झालेला हा डेटा असल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे.
 
गहाळ झालेली माहिती
ही घुसखोरी जवळपास दीड वर्षांपूर्वी झाली होती आणि आपल्या लक्षात आल्याबरोबर त्याबद्दलची पावलं उचलण्यात आली होती असं फेसबुकने म्हटलंय.
 
पण त्यावेळी चोरण्यात आलेली ही माहिती आता हॅकिंग फोरम्समध्ये प्रसिद्ध करण्यात येत असून ती सगळ्यांना पाहता येतेय.
 
या डेटाबेसमध्ये 106 देशांतल्या 53.3 कोटी लोकांचा समावेश असल्याचं या डेटाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामध्ये युकेमधल्या 1.1 कोटी, अमेरिकेतल्या 3 कोटी आणि ऑस्ट्रेलियातल्या 70 लाख फेसबुक युजर्सचा समावेश आहे.
 
"यामध्ये प्रत्येक फेसबुक युजरची सगळी माहिती उघड झालेली नाही. यात 50 कोटी मोबाईल फोन नंबर्स आहेत तर काही लाख ईमेल आयडी आहेत," HaveIBeenPwned या वेबसाईट चालवणारे सुरक्षा तज्ज्ञ ट्रॉय हंट यांनी त्यांच्या वेबसाईटवरच्या ब्लॉगवर म्हटलंय.
 
फेसबुकच्या डेटा लीकविषयीच्या बातम्या येऊ लागल्यानंतर या वेबसाईटला भेट देण्याऱ्यांची संख्या अचानक वाढली. त्यानंतर आपण ईमेल अॅड्रेससोबतच फोन नंबर शोधण्याचा पर्यायही सुरू केल्याचं हंट सांगतात.
 
या डेटा ब्रीचदरम्यान खुद्द मार्क झकरबर्ग यांचा फोननंबरही जगजाहीर झाल्याचं म्हटलं जातंय. मार्क झकरबर्ग फेसबुकचे चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत.
 
झकरबर्ग यांच्या लीक झालेल्या फोननंबरचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता.
 
हा स्क्रीनशॉट ट्वीट करत सुरक्षा तज्ज्ञ डेव्ह वॉकर यांनी म्हटलं, "नुकतीच फेसबुकवरून जी माहिती लीक झाली त्यामध्ये झकरबर्ग यांच्या अकाऊंटशी जोडण्यात आलेला हा फोननंबर आहे."
 
या सगळ्यासोबतच मार्क झकरबर्ग सिग्नल हे मेसेजिंग अॅप वापरत असल्याचंही या स्क्रीनशॉटवरून दिसतंय.
 
सुरक्षेच्या कारणास्तव युजर्सनी त्यांचे फोन नंबर्स नोंदवावेत अशी विनंती फेसबुकने 2011 पासून युजर्सना करायला सुरुवात केली होती. या फोन नंबरच्या मदतीने 'टू - फॅक्टर ऑथेंटिकेशन' करता येतं. यामध्ये अकाऊंटमध्ये लॉग इन करताना त्या युजरच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर मेसेज येतो.
 
ऑगस्ट 2019मध्ये डेटा ब्रीच झाला होता आणि त्याबद्दलची कारवाई करण्यात आली होती, असं सांगण्याशिवाय या सगळ्या प्रकरणाबद्दल फेसबुकने काहीही म्हटलेलं नाही.
 
हंट सांगतात, "फेसबुकने याबाबतची त्यांची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. 2019मधली घटना या सगळ्याचं मूळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण सध्या पसरणाऱ्या डेटाबद्दलचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही. त्यांच्याकडून काहीही माहिती न आल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत."
 
याबद्दलच्या प्रतिक्रियेसाठी बीबीसीने फेसबुकला संपर्क केला होता. पण त्यावर त्यांचं उत्तर आलेलं नाही.
 
दरम्यान फेसबुकवर युजर्सची प्रायव्हसी कशी जपली जातेय, यावर लक्ष ठेवून असणाऱ्यांनी - वॉचडॉग्सनी या प्रकरणाबद्दलचा तपास करायला सुरुवात केली आहे.
 
गहाळ होऊन जगजाहीर झालेला हा तपशील खरंच 2019मधला आहे का हे तपासण्यासाठी आपण एका प्रथितय टेक कंपनीसोबत काम करत असल्याचं आयर्लंडने म्हटलंय.
 
तर फिलिपिन्स आणि हाँगकाँगनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

DC vs LSG Playing 11: अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांचे संघ एकमेकांसमोर येणार

कुणाल कामरा वाद प्रकरणात राहुल कनालसह ११ जणांना अटक, अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल

गद्दार ते गद्दारच, कुणालने काहीही चुकीचे बोलले नाही- उद्धव ठाकरेंचे विधान समोर आले

जर घरे पाडली तर आम्ही घरात घुसून मारहाण करू, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नरेंद्र पाटील यांचा इशारा

LIVE: राहुल गांधी आणि कामरा दोघांनीही संविधान वाचलेले नाही, शिंदेंवरील टिप्पणीवर मुख्यमंत्री संतापले

पुढील लेख
Show comments