Dharma Sangrah

डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे 4 व्यायाम करा

Webdunia
गुरूवार, 1 एप्रिल 2021 (08:30 IST)
आजच्या काळात आपण स्क्रीनवर 9 तासांपेक्षा जास्त वेळ घालवता .यामुळे डोळ्यांची समस्याही वाढली आहे. संगणकानंतर, लोक थेट मोबाइल देखील हाताळतात.यामुळे डोळ्यांवर ताण येणं साहजिक आहे. डोळ्याच्या त्रासाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे काही साधे उपाय आहे. ज्यांना अवलंबवून आपण डोळ्यांना आराम देऊ शकता. हे व्यायाम आपण ऑफिस मध्ये खुर्चीवर बसून देखील करू शकता. 
 
1 डोळ्यांची हालचाल- आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये सतत बघत असतो. काही वेळ जरी डोळ्यांची हालचाल केली तर डोळ्यांना त्रास होऊ लागतो. आपण आरामशीर खुर्चीवर बसा, आपल्या समोर घडी ठेवली आहे असा विचार करा. सर्वप्रथम डोळे 12 वाजेच्या दिशेने फिरवा नंतर 6 वाजेच्या सुई कडे बघून डोळे फिरवा. 
 
2 उजवी-डावी,वर-खाली हालचाल करा- डोळे स्थिर ठेवा. नंतर 9 वाजेच्या सुई वर डोळे ठेवा नंतर काट्यासह डोळे फिरवा. 3 वर डोळे ठेवा आणि सुईसह डोळे फिरवा. त्याच क्रमाने 11,2 4,7 च्या सुईवर वर डोळे केंद्रित करा नंतर फिरवा.  
 
3 जवळ-लांब- बऱ्याचदा डोळ्यांसाठी एकाच ठिकाणी जास्तवेळ ठेववल्याने लांब आणि जवळ चे बघायला त्रास होतो. अशा परिस्थितीत आपण आपला अंगठा जवळ लांब करत राहा. असं किमान 10 वेळा करा. आपण अंगठ्याला शक्य तेवढे लांब न्या नंतर नाकाच्या जवळ आणा. नंतर उलट्या दिशेने करा. असं किमान 10 वेळा करा.
 
4 डोळ्यांना स्वच्छ करा-बऱ्याचवेळा आपण असे म्हणतो की डोळ्यात जळजळ होते.डोळ्यांना स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय आहे. कोणत्या ही वस्तूला समोर ठेऊन त्याच्या कडे एकटक बघा. पापण्यांची उघडझाप करू नका. असं डोळ्यातून पाणी येई पर्यंत करा. असं केल्याने काही वेळातच आपल्याला आराम वाटेल.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

Summer Recipes : उन्हाळयात शरीराला थंडावा देणाऱ्या कोशिंबिरींच्या रेसिपीज; नक्कीच ट्राय करा

अतिशय शाही आणि चविष्ट पदार्थ मावा साबुदाणा खीर रेसिपी

तुम्ही शौचालय वापरताना या ३ चुका करता का, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे, मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचावासाठी उपाय

Career in Bachelor of Naturopathy and Yogic Science : बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चमकदार त्वचेसाठी ज्येष्ठमध लावण्याचे फायदे आणि पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments