Marathi Biodata Maker

महावीरासन करा आणि कंबर सडपातळ ठेवा

Webdunia
बुधवार, 10 एप्रिल 2019 (15:54 IST)
दंडस्थितीतील एक आसन आहे. या आसनात शरीराची अवस्था वीर हनुमानाप्रमाणे होते म्हणूनच याला महावीरासन म्हटले आहे. हे करायला अतिशय सोपे आहे. प्रथम दंड स्थितीत उभे रहावे, भरपूर श्‍वास घ्यावा, मग श्‍वास रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्ती जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा. साधारण अंदाजे तीन फूट पुढे नेला तरी चालेल. मग दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या आणि हात कोपरामध्ये दुमडून वर हवेत न्यावेत, जणुकाही फार मोठे वजन उचलत आहोत अशी अवस्था हातांची करावी. हे आसन एकदा डावा पाय पुढे घेऊन करावे व एकदा उजवा पाय पुढे घेऊन करावे. आसन सोडताना सावकाश श्‍वास सोडावा, हळूहळू पुढे घेतलेला पाय माघे घ्यावा.
 
जर हे आसन भरभर केले तर त्याचा फायदा अधिक होईल. पाय पुढे मागे उजवीकडून आणि डावीकडृून जलद करावे. या आसनाचे फायदे अनेक आहेत. या आसनामुळे उंची वाढायला मदत होते. हात पाय बळकट होतात. पोट साफ आणि हलके होते. छाती भरदार होते. शरीर तेजस्वी आणि मजबूत बनते. महावीरासनामुळे कंबरेला ताण बसतो आणि कंबरेभोवतीचे सर्व स्नायू लवचिक बनतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आपली प्रकृती उत्तम राखण्यासाठी महावीरासन नियमित करावे. स्त्रियांनीसुद्धा हे आसन नियमित करावे. यामुळे पोटाचे विकार बरे होते. मासिक पाळीतील आरोग्य सुधारते. हाता-पायातील रक्‍ताभिसरण चांगल्याप्रकारे होऊन हाता-पायांची हाडे मजबूत होतात. या आसनाचा कालावधी हवा तेवढा ठेवता येतो. कारण हे करायला सोपे आसन आहे.
 
हाताच्या पंजांच्या मुठी आवळल्यामुळे बोटांचे कार्य सुधारते. तेथील स्नायू आणि हाडांना बळकटी येते. आसनस्थिती घेतल्यानंतर श्‍वास घेऊ नये आणि सोडूही नये म्हणजेच श्‍वास रोखून कुंभक करावे. आसन सोडताना श्‍वास सोडत नेहमीचे संथ श्‍वसन करावे. हे आसन करताना मागचा पाय थोडासा उचलला जातो. या आसनामुळे पुरुषांची संभोगशक्‍ती वाढते, स्त्रियांचा योनीमार्ग खुला होतो तसेच ज्या स्त्रियांची मासिक पाळी काही कारणामुळे वयात असताना बंद झाली असेल त्यांची मासिक पाळी या आसनामुळे सुरु होते. हे आसन नियमित केले असता बुटक्‍या लोकांची उंची वाढण्यास मदत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात आता गाजर हलवा नको, तर चविष्ट गाजर गुलाब जामुन बनवा

यकृत खराब होण्याच्या 3 महिने आधी शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन अर्थ सायन्स इंजिनिअरिंग करून करिअर बनवा

नवीन वर्षाच्या पार्टीत असे मेकअप करा, लोक बघत राहतील

हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता या गोष्टी दूर करतील, आहारात समावेश करा

पुढील लेख
Show comments