Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yoga for Anxiety चिंतामुक्त व्हायचं असेल तर फक्त हे 2 योग करा

Webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:03 IST)
योगाने सर्व प्रकारच्या आजारांवर मात करता येते. मग तो आजार मानसिक का नसो. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त काळजी केल्याने चिंता निर्माण होते. आणि ताण आणि चिंता या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. अनेकदा लोक त्यांना एक समजतात आणि त्यासाठी उपचाराचे मार्ग शोधू लागतात. तुम्ही देखील या समस्येचे बळी आहात का? आणि यासाठी महागड्या उपचारांचा अवलंब करत आहात का? यासाठी थेरेपी किंवा औषधे घेत आहात? जर तुमचे उत्तर होय असेल, तर हे सर्व करणे आताच थांबवा. येथे आम्ही काही आसनांबद्दल माहिती देत आहोत ज्याचे अवलंबन करुन आपण चिंतामुक्त होऊ शकता-
 
बद्ध कोणासन
चिंतामुक्तीसाठी बटरफ्लाय पोज कशी करावी
जमिनीवर पाय पसरून बसा.
त्यानंतर पाय आतील बाजूस वळवा.
लक्षात ठेवा की तुमचे तळवे एकमेकांना स्पर्श करत असले पाहिजेत.
आता हाताच्या साहाय्याने घोट्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करा.
आता दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना गुडघे जमिनीवर दाबा. जास्त दबाव आणू नका.
आता फुलपाखरासारखे तुमचे दोन्ही पाय वर खाली करा.
हळूहळू सुरुवात करा. मग वेग वाढवा.
हा योग रोज 15 मिनिटे केल्याने समस्या कमी होईल.
 
सेतुबंध आसन
हे आसन कसे करावे?
प्रथम आपल्या पाठीवर जमिनीवर झोपा.
आता गुडघे आतून वाकवा.
आपले हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि तळवे जमिनीवर ठेवा.
आता हळूहळू श्वास घेताना तुमची पाठ आणि नितंब वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा.
खांदे आणि डोके जमिनीवर ठेवा.
हनुवटी छातीवर ठेवा.
आता श्वास घ्या आणि काही वेळ या आसनात राहा.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments