Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Chinese Horoscope 2021 चिनी ज्योतिष आपल्या बद्दल काय सांगत जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 26 डिसेंबर 2020 (09:51 IST)
वर्ष 2021 'दि इयर ऑफ मेटल ऑक्स'
चिनी ज्योतिषानुसार मेटल रॅट वर्ष 4 फेब्रुवारी 2020 पासून सुरू झाले जे येत्या 25 जानेवारी 2021 रोजी संपेल. 'दी इयर ऑफ मेटल ऑक्स 'ची सुरुवात 12 फेब्रुवारी पासून सुरू होईल आणि त्याचे शेवट 31 जानेवारी 2022 रोजी संपेल. 12 चिनी राशीं पैकी 'ऑक्स' दुसऱ्या क्रमांकावर येत. या वर्षाचे विशेष महत्त्व आहे. ही राशी 'यिन' तत्त्वाची आहे. ज्याचे लक्षण असतात प्रामाणिकपणा, चिकाटी, परिश्रम आणि समर्पण.
 
वर्ष 2021 बैलाचे आहे, म्हणून हे वर्ष खूप मेहनतीचे आणि मजबूत आणि आत्मविश्वासाने भरणारे राहील. मेटल ऑक्स वर्षा मध्ये सामान्य लोकांचा स्वभाव प्रामाणिक राहील. चिनी राशीफळ जन्म वर्षाच्या आधारे बघतात. चला तर मग जाणून घेऊ या की आपली चिनी राशी काय आहे आणि हे नवीन वर्ष आपल्या साठी काय घेऊन आले आहे ते.  
 
1  चिनी राशिफळ वर्ष 2021 : उंदीर राशी 
जन्माचे वर्ष : 1924, 1936, 1948, 1960, 1972, 1984, 1996, 2008, 2020, 2032
 
उंदीर : या राशीच्या लोकांना या वर्षी आपल्या आर्थिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. कारण मागील वर्षी आपण जे काही पैसे जमा केले होते, ते आपल्याला या वर्षी 2021 मध्ये आर्थिक अडचण येऊ देणार नाही. अशा कठीण परिस्थितीत आपण त्या पैशाचा वापर करून आपली सर्व इच्छा पूर्ण करण्यात सक्षम राहाल.
 
साधारणपणे उंदीर राशीचे लोक थोडे कमी मेहनती असतात. अशा परिस्थितीत आपण संचित केलेले पैसे या वर्षी आपल्या सर्व गरजा लक्षात ठेवून आपल्यासाठी उपयोगात येतील. मेटल ऑक्सचे वर्ष या राशीच्या लोकांना ताण तणाव देत राहील. या राशीच्या लोकांना आपल्या करिअरमध्ये वेगवान राहण्याची गरज आहे. या काळात हे लोक आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझे मुळे स्वतःला थकलेलं अनुभवाल. या मुळे एकाएकी ताण वाढेल. चिनी राशीफळानुसार उंदीर राशीचे लोक चांगले असतात आणि हेच या राशीचे वैशिष्ट्ये आहे की हे या राशींच्या लोकांची कामे वेळेच्या पूर्वीच पूर्ण करण्यात मदत करते. या कारणास्तव आपण बघावे तर आपल्यासाठी हे वर्ष 2021 मिश्रित परिणाम आणत आहे. 
 
2 चिनी राशीफळ वर्ष 2021 : बैल/गाय राशी 
जन्माचे वर्ष : 1925, 1937, 1949, 1961, 1973, 1985, 1997, 2009, 2021, 2033
 
हे वर्ष या बैल गाय राशीच्या अंतर्गत येणाऱ्या लोकांसाठी अनुकूल जाणार आहे. या वर्षी या राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल. हे लोक स्वतःला मानसिक दृष्ट्या बळकट आणि सर्व तणावापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. कार्यक्षेत्रात देखील या लोकांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता आहे.
 
या राशीचे लोक खूपच कष्टाळू आणि परिश्रमी असतात. अशा स्थितीत या चांगल्या गुणवत्तेमुळे चांगले फळे मिळतील. वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी देखील मेहनतीच्या बळावर या राशीच्या लोकांसाठी आकर्षित होतील. केलेल्या कामाची प्रशंसा कार्यस्थळी होईल, ज्यामुळे आदर वाढेल. जर आपण व्यवसायी आहात तर पैसे कमाविण्याचा बऱ्याच संधी मिळतील ज्यामुळे आर्थिक अडचण दूर होईल. 
 
विवाह करण्याच्या इच्छुक लोकांसाठी हे वर्ष चांगले राहील. विवाहितांना कुटुंबाला वाढविण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असल्यामुळे घरात एखादी मांगलिक कार्य होतील. ज्यामुळे आपले पैसे खर्च होतील. पण आर्थिक अडचण जाणवणार नाही.
 
3 चिनी राशीफळ वर्ष 2021 : वाघ राशी
जन्माचे वर्ष :1926, 1938, 1950, 1962, 1974, 1986, 1998, 2010, 2022, 2034
 
या राशीच्या जातकांसाठी वर्ष सामान्यांपेक्षा थोडे कमी आहे. कारण या वर्षी परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे आपल्याला लढा द्यावा लागेल. व्यापारी वर्गाला देखील बऱ्याच आव्हाहनांना सामोरी जावे लागेल एखादी मोठी गुंतवणूक करताना घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आवर्जून घ्यावा. 
 
या राशीच्या लोकांना आपले प्रत्येक काम करण्यात बऱ्याच अडचणी येतील. या कारणास्तव आपल्या मानसिक ताणात वाढ होईल. साधारणपणे या राशीचे लोक खूप हट्टी असतात, ज्या मुळे त्यांच्या आणि त्यांच्या जोडीदारात गैरसमज निर्माण होऊ शकतात. या मुळे दोघांमध्ये वर्षभर वाद होतील. या राशीच्या लोकांना आपल्या रागावर नियंत्रण करावे लागेल. आर्थिक दृष्ट्या देखील हे वर्ष चांगले नाही.
 
4 चिनी राशीफळ वर्ष 2021: ससा राशी 
जन्माचे वर्ष : 1927, 1939, 1951, 1963, 1975, 1987, 1999, 2011, 2023, 2035 
 
या राशीच्या लोकांना आपल्या कष्टाने प्रत्येक कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल. अशा परिस्थितीत कोणतेही शॉर्टकट न घेता प्रयत्न सुरू ठेवावे लागेल. कोणत्या जवळचा मित्र किंवा कुटुंबीयाशी वाद झाल्यामुळे या लोकांना मानसिक ताण मिळेल.
 
या वर्षी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण या लोकांना वेदना, निद्रानाश, सर्दी-पडसं सारख्या किरकोळ त्रासांना सामोरी जावे लागेल. या मुळे ह्याचा परिणाम कार्यक्षेत्रावर पडेल अशा मध्ये सर्व चिंता दूर ठेवून उत्तम आहारावर लक्ष द्या. 
 
या काळात सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्नात लागाल. या काळात आपले मन उदास असेल स्वतःला एकटे समजाल. अशा परिस्थिती शांत राहा आणि जीवनात येणारे सर्व बदल शांततेने स्वीकारा. एकंदरीत म्हणावे तर हे वर्ष 2021 या राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल राहणार आहे. 
 
5 चिनी राशीफळ वर्ष 2021 : ड्रॅगन राशी 
जन्माचे वर्ष : 1928, 1940, 1952, 1964, 1976, 1988, 2000, 2012, 2024, 2036
 
ड्रॅगन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष नेहमीपेक्षा चांगले जाईल. कारण हे लोक बळकट व्यक्तिमत्त्वाचे असतात, ह्यांची निर्णय घेण्याची क्षमता इतरांपेक्षा खूप वेगळी आणि चांगली आहे. हे आपले काम पूर्ण प्रामाणिक पणे करतात. अशा परिस्थितीत हे वर्ष 2021 या गुणवत्तेमुळे खूप चांगले जाणार आहे. हे आपले काम प्रामाणिकपणाने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात सक्षम व्हाल.
 
या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळेल, त्याचा वेग हळू असेल, ह्यांना आपल्या कार्यात थोडे संघर्ष करावे लागतील. नंतर आपले केलेले कार्य आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसतील, जेणे करून आपली प्रगती निश्चित होईल. या वर्षी भौतिक सुखांसाठी प्रयत्न कराल.अशा परिस्थितीत आपल्याला ह्याच गोष्टीकडे विचार न करता कामाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे. आपल्याला कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनाला परिपूर्ण सामंजस्याने बसवावे लागेल, तरच हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी ऑक्स वर्ष सिद्ध होईल.
 
6 चिनी राशीफळ वर्ष 2021 : साप राशी 
जन्माचे वर्ष - 1929, 1941, 1953, 1965, 1977, 1989, 2001, 2013, 2025, 2037
 
या राशीच्या लोकांना या वर्षी 2021 मध्ये आळशीपणामुळे कोणतेही काम करण्यात अडचण होईल. मनात काहीसे गोंधळ होतील, या मुळे आर्थिक संकटे येतील. इतरांच्या गोष्टींना महत्त्व कमी देणं, हे या वर्षी चांगले सिद्ध होणार नाही. अशा परिस्थितीत इतरांच्या शब्दाला महत्त्व देणं हे महत्त्वाचे असेल. या राशींच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांचा राग या वर्षी त्यांचा साठी मोठे शत्रू असण्याचे सिद्ध होईल. कारण अशी ही शक्यता आहे की आपण रागाच्या भरात येऊन एखाद्या महिला सहकाऱ्याशी वाद घालाल, ज्यामुळे आपली छवी खराब होऊ शकते. कार्यक्षेत्रात देखील ह्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. एकंदरीत बघावं तर हे ऑक्स वर्ष चांगले सिद्ध होणार नाही. 

7 चिनी राशीफळ वर्ष 2021 : घोडा राशी  
जन्माचे वर्ष : 1930, 1942, 1954, 1966, 1978, 1990, 2002, 2014, 2026, 2038
 
या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष मिश्रित परिणाम घेऊन येत आहे. जर आपण एखाद्या वर प्रेम करत असाल, तर आपल्या प्रियकरासह वर्षभर या राशीच्या लोकांचे वाद होतील. वैवाहिक जीवनात देखील जोडीदारासह कौटुंबिक परिस्थितीला घेऊन मतभेद संभवतात. 
 
संपूर्ण वर्ष नात्यात जागरूक राहण्याची आणि वर्षभर नाती दृढ करण्याची गरज आहे. या साठी आपण आपल्या जोडीदारासह कुठेतरी जाण्याची योजना आखावी. जिथे आपण एकमेकांशी बोलून प्रत्येक प्रश्न सोडवू शकाल. आपण यावेळी कोणती ही गोष्ट इतरां समोर स्पष्टपणे मांडण्यात अपयशी व्हाल.
 
व्यापारी वर्गाला उत्तम फायदा होईल आणि ते वेगवेगळ्या स्रोतांकडून पैसे कमाविण्यात यशस्वी होतील. या परिस्थितीत आपले परिश्रम आणि प्रयत्ने सुरू ठेवा. आर्थिक जीवनात देखील फायदे दिसून येत आहे. एकंदरीत म्हणावं तर हे वर्ष या राशीच्या लोकांना बऱ्याच क्षेत्रात चांगले तर बऱ्याच क्षेत्रात आव्हानात्मक निकाल देणारे आहे.
 
8 चिनी राशीफळ वर्ष 2021 : मेंढी राशी 
जन्माचे वर्ष : 1931, 1943, 1955, 1967, 1979, 1991, 2003, 2015, 2027, 2039
 
या राशींच्या लोकांसाठी हे वर्ष बरेच आव्हाने घेऊन येणारा ठरणार आहे. कारण या वर्षी ह्यांना बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरी जावे लागणार आहे, ज्यामुळे पैशाची कमतरता जाणवेल. वैवाहिक जीवनात आणि प्रेम संबंधात संघर्ष होईल. 

नोकरीच्या ठिकाणी कोणतेही गैर समज झाल्यामुळे, लाजिरवाणी होऊ शकाल. अशा परिस्थितीत स्वतःला स्पष्ट ठेवणे ह्यांच्या साठी चांगले होईल. या वेळी हे लोक स्वतःवर लक्ष केंद्रित करतील. या वेळी पैसे देखील खर्च होतील. 
 
व्यापारांना व्यवसायाला वाढविण्यासाठी योग्य रणनीती बनविण्यासाठी वडिलधाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकाराची मदत घेण्यास मागेपुढे बघू नका. कारण ह्या वर्षी या लोकांना त्यांच्या मित्रांची आणि नातेवाइकांची साथ मिळेल. ज्यामुळे परिस्थिती बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याची दिसून येईल. एकंदरीत म्हणावं तर हे वर्ष या राशींच्या लोकांसाठी मिश्रित राहणारे आहे.
 
9 चिनी राशीफळ वर्ष 2021 : माकड राशी 
जन्माचे वर्ष : 1932, 1944, 1956, 1968, 1980, 1992, 2004, 2016, 2028, 2040
 
माकड राशी च्या लोकांना या वर्षी सामान्य फळे मिळतील. कारण या वेळी आपण साधे पणाने जीवन जगताना बघाल. या वेळी आपण आपल्या पैसे जमा करण्यात यशस्वी व्हाल. करिअर च्या क्षेत्रात चांगले फायदे मिळतील या मुळे कार्यक्षेत्रात प्रगती होईल. 
 
या काळात आपल्याला आयुष्यात काही आव्हानांना सामोरी जावे लागू शकत. हे लोक आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक समस्ये पासून मुक्त होतील. वर्षाच्या मध्य काळात प्रवास करण्याची संधी मिळेल. या दरम्यान काही नुकसान होऊ शकतात, म्हणून प्रवासाच्या दरम्यान आपली सर्व कागद पत्रे आणि सामान व्यवस्थित ठेवा. 
 
कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.प्रेमाच्या जीवनात देखील हे वर्ष चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सर्वात चांगलं आहे, कारण या वर्षी एखाद्या जुन्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल.
 
10 चिनी राशीफळ वर्ष 2021 : कोंबडी राशी 
जन्माचे वर्ष :1933, 1945, 1957, 1969, 1981, 1993, 2005, 2017, 2029, 2041
 
या राशीच्या लोकांसाठी हे बैल वर्ष खूप चमकणारे आहे. या वेळी हे लोक आपल्या परिश्रम आणि प्रयत्नांच्या बळावर आपल्या कार्यक्षेत्रात यश संपादन करतील.या मुळे आपले मित्र आणि सहकारी आपल्या कडे आकर्षित होतील. 

तसेच कार्यक्षेत्रात आपले अधिकारी प्रगती आणि उन्नती बद्दल विचार करतील. या वेळी आपले धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल, आणि कौटुंबिक आनंद मिळेल. कुटुंबात एखादी चांगली आनंदाची बातमी मिळेल त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यापारी वर्गाला कामाच्या स्थळी चांगली कामगिरी दर्शविण्याची संधी मिळेल. या लोकांची भेट नवीन लोकांशी होईल, ज्यामुळे ह्यांना लाभ मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात साथीदारांसह चांगले क्षण घालवाल.एकंदरीत म्हणावं तर हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे.
 
11 चिनी राशीफळ वर्ष 2021 : कुत्रा राशी 
जन्माचे वर्ष : 1934, 1946, 1958, 1970, 1982, 1994, 2006, 2018, 2030, 2042
 
कुत्रं राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आपल्याला  योग्य योजना आणि योग्य रणनीतीनुसार काम करण्याचा सल्ला दिला जात आहे. अन्यथा कोणतेही काम करण्यात आपण अक्षम असाल. हे वर्ष या राशींच्या लोकांसाठी प्रतिकूल आहे, या मुळे आपल्याला वेळोवेळी आव्हानांना सामोरी जावे लागेल. अशा परिस्थितीत स्वतःला निरोगी ठेवा आणि कठोर परिश्रम करा. एकाएकी खर्चात वाढ होईल, म्हणून सुरुवातीपासूनच पैशाची साठवण करण्याचा प्रयत्न करा.
 
कार्यक्षेत्रात ह्यांची कामगिरी चांगली नसल्यामुळे वरिष्ठ अधिकारी असंतुष्ट आणि नाखुश राहतील. ज्यामुळे या लोकांवर कामाचे तसेच मानसिक ताण राहील. प्रेम जीवनात देखील स्वतःला चिंतामुक्त ठेवण्यात अपयशी ठराल.
 
 
12 चिनी राशीफळ वर्ष 2021 : डुक्कर राशी 
जन्माचे वर्ष :  1935, 1947, 1959, 1971, 1983, 1995, 2007, 2019, 2031, 2043
 
या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सामान्यांपेक्षा कमी असणार आहे. कारण या वेळी या लोकांना आपल्या कामाबद्दल अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तणावात वाढ होईल, मनात संभ्रमक स्थिती राहील. व्यवहारात चिडचिड होईल.ज्याचा विपरीत परिणाम ह्यांच्या कार्यक्षेत्रात होईल.
 
करिअरच्या क्षेत्रात वेळोवेळी प्रगती करण्याच्या बऱ्याच संधी मिळतील, पण आळशीपणा मुळे हे लोक त्या संधींचा फायदा घेण्यास अपयशी ठरतील. व्यापारी वर्गासाठी हे वर्ष चांगले आहे. व्यवसायात प्रचंड फायदा होईल. आव्हान आणि जोखीम घेण्यासाठी घाबरत असाल,तर या वर्षी आपल्याला अधिक कष्ट करावे लागतील.
 कोणत्याही प्रकाराचे व्यवहार करण्यापूर्वी योग्य प्रकारे सल्ला घेणे चांगले राहील. या राशीच्या लोकांची भेट काही नवीन लोकांशी होऊ शकते, ज्यांच्याशी चांगले संबंध बनविण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष मिश्रित आहे. आरोग्याच्या दृष्टीने या राशीच्या लोकांच्या मानसिक तणावात वाढ होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments