Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तूळ राशी भविष्य 2021

Webdunia
मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (14:29 IST)
वर्ष 2021 हे थोडे त्रासदायक दिसून येत आहे. पण आपण तर एक सामर्थ्यवान योद्धा आहात प्रत्येक समस्येशी लढण्यासाठी आपण सक्षम आहात. सर्व अडचणींवर मात कराल. हे वर्ष आपल्या साठी आनंद घेऊन येणारे असेल परंतु आरोग्या बाबतीत काळजीत टाकणारे देखील असेल. 
 
वर्ष 2021 मध्ये आरोग्याकडे बरेच लक्ष द्यावे लागेल कारण कोणते ही केलेले दुर्लक्ष आपल्याला बऱ्याच काळा पर्यंत त्रासदायक राहील. कुटुंबापासून दूर जावे लागेल. एखादे मोठे त्रास सहन करावे लागतील. आर्थिक पक्षाच्या बाबतीत देखील हे वर्ष मधून मधून साधारण फळ देणारे असेल. या वर्षी काही नवी नाते जुळतील. 
 
तूळ राशीचे लोक वर्ष  2021 च्या मध्यकाळात काही तरी नवीन शिकतील. जे लोक परदेशी जाण्याची इच्छा बाळगतात त्यांच्या साठी काही आशा घेऊन येत नाही. एप्रिल ते जून च्या मध्यकाळात चांगले निकाल मिळतील आणि बढतीचे योग जुळून येतील. चला तर मग जाणून घेऊ या की हे वर्ष रोमांस,धन,करिअर आणि आरोग्यासाठी कसे असेल.  
 
रोमांस साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
रोमांसच्या बाबतीत हे वर्ष 2021 तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले असेल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. ज्यांनी आतापर्यंत मागणी घातलेली नाही त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच मागणी घालावी,कारण एप्रिल -मे पासून ग्रहांची स्थिती आपल्या पक्षात नसेल. ज्यांचे प्रेम संबध सुरु आहे ते या वर्षी शांत राहतील. विवाहाचे योग बनत नाही पण संबंध देखील तुटणार नाही कारण तूळ राशीचे लोक संबंधाला जपण्यात पटाईत असतात. आपण विवाहित असाल तर हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी चांगले असेल.जोडीदार देखील आपल्यासाठी यशाच्या मार्गावर प्रकाश टाकेल. त्याचा सल्ला आपल्यासाठी मोलाचा ठरेल आणि आपण पुढे वाढालं.
 
आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
जानेवारी ते मार्च पर्यंतचा काळ आपल्याला निराश करणारा असेल. पैशाच्या बाबतीत संघर्षाची स्थिती बनेल पण धैर्य ठेवा एप्रिल ते मे महिन्याच्या मध्य काळात आपल्याला मोठा फायदा होण्याचे योग जुळून येतील आणि हा फायदा आपल्या सर्व अडचणींची पूर्तता करेल. या राशीच्या लोकांना ऑगस्ट 2021 च्या महिन्यात सरकारकडून एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे . प्रवासामुळे पैसे खर्च होतील. वर्षाच्या मध्य काळात या राशीच्या लोकांना पैशे आणि संपत्ती मिळेल. वर्षाचे अखेरचे महिने सुरुवातीच्या महिन्या सारखेच कमकुवत दिसत आहे पण आपण नशिबापेक्षा कठोर परिश्रम आणि आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत असाल तर ग्रहांची स्थिती देखील बदलू शकेल पण हे तेव्हाच शक्य असेल जेव्हा आपण उत्साही असाल. या काळात आपल्याला एखाद्यी जंगम किंवा स्थावर मालमत्ता मिळेल.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
नोकरदार वर्गासाठी या वर्षाच्या मध्यकाळातील काही महिने शुभ असतील. सुरुवातीचा काळात आपण काही काळजीत राहाल. ऑफिसमधील कामाचा ताण आणि कामामुळे निराशा येईल पण वर्षाच्या मध्यकाळात आपल्याला चांगला परिणाम मिळेल कामात आपले मन लागेल. आपल्याला प्रशंसा मिळेल, तर पदोन्नती देखील होईल. आपण व्यवसाय करीत असाल तर वर्ष 2021 सर्वसाधारणपणे फायदेशीर ठरेल.किरकोळ व्यावसायिकांना सांभाळायला वेळ लागेल. ज्यांच्या कडे नोकरी नाही त्यांना या वर्षी अपेक्षित यश मिळणार नाही पण निराश होऊ नका वर्षाच्या मध्यकाळात हातात जी नोकरी येईल ती घ्या आणि पुढील तयारीला लागा.सरत्या वर्षात अपेक्षे प्रमाणे यश मिळेल.
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 :
तूळ राशीच्या लोकांसाठी  हे 2021 चे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने काळजीत टाकणारे  असेल.खाण्या-पिण्याच्या निष्काळजीपणामुळे आपल्याला अन्नातून विषबाधा होऊ शकते. एखाद्यी छोटी शल्यक्रिया संभवते. जुन्या आजारापासून देखील आराम मिळणार नाही. जर आपण नियमितपणे दिनचर्या सांभाळत असाल तर सर्व अडचणींवर मात करू शकाल.आरोग्याच्या दृष्टीने नशीब कमकुवत आहे पण आपण आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर आयुष्याचे चित्र बदलू शकाल. प्रत्येक प्रकाराचे आजार टाळण्यासाठी आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments