Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई मध्ये घेवू शकाल श्रीराम दर्शन अयोध्येसारखे हुबेहुब मंदिर तयार

Webdunia
सोमवार, 22 जानेवारी 2024 (13:00 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना निवेदन केले आहे की २२ जानेवारीला आपल्या घरी देवे लावा. मुंबई आणि असपासचे लोक जे अयोध्या जाऊ शकणार नाही. त्यांच्यासाठी ठीक अयोध्यासारखे हुबेहुब मंदिर शहराच्या जवळ मीरा भायंदर मध्ये बनवले गेले आहे. मीरा भायंदरच्या जैसल पार्कमधल्या मोकळ्या मैदानात ८० फूट ऊंच भगवान श्रीराम यांचे मंदिर बनवले गेले आहे. आयोजकांनी सांगितले की २२  २८ जानेवारी पर्यंत लोक प्रभु श्रीरामांचे दर्शन घेवू शकतात. सात दिवसांपर्यंत मंदिरात  दोन्ही वेळी महाआरती सोबत वेगवेगळे भजन प्रस्तुत केले जातील. 
 
सात दिवस सकाळ-संध्याकाळ आरती: 
२२ जनेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्यात जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतील तव्हाच येथील श्रीराम यांची स्थापना होईल. भाजप नेते एड रवि व्यास आणि टीमव्दारा बनवलेले श्रीराम मंदिर जे हुबेहुब अयोध्यातील श्रीराम मंदिराची प्रतिकृति आहे. या मंदिरात रामदरबार सजवला गेला आहे. श्रद्धाळू २२ ते २८ जानेवारी पर्यंत दर्शनाचा लाभ घेवू शकतील. अयोध्येत प्राणप्रतिष्ठावेळी ह्या पूजेची, महाआरतीने याची सुरवात होईल. आणि मोठ्या स्क्रिनवर लोक अयोध्येत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे लाइव प्रसारण पण पाहू शकतील. संध्याकाळी एक दिवा रामनामसंकल्प सोबत दीपोत्सव साजरा केला जाईल. सात दिवसपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ महाआरती होईल आणि प्रत्येक दिवशी भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यांत विभिन्न संस्था आणि संस्था व्दारे प्रस्तुत केले जातील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

अयोध्या विशेष

अयोध्येतील राम मंदिर कसे असणार, जाणून घ्या

श्रीरामाचा जन्म अयोध्येतच का झाला?

रामाचे चित्र असलेली खास साडी सुरतहून अयोध्येला पाठवली जाणार

अयोध्या VS लंका, राम आणि रावणाची नगरी जाणून घ्या

अरुण योगीराज यांनी कोरलेली 'राम लल्ला'च्या मूर्तीची निवड

पुढील लेख
Show comments