Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Davos 2020: दावोस परिषदेविषयी जाणून घेण्यासारखं सर्वकाही...

Webdunia
मंगळवार, 21 जानेवारी 2020 (12:05 IST)
जागतिक अर्थविषयक परिषदेची 50 वी परिषद स्वित्झर्लंडमधील दावोस येथे भरणार आहे. त्यासाठी यावर्षी फक्त पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल जाणार आहेत. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत. 2018मध्ये नरेंद्र मोदी या परिषदेला गेले होते. गेल्या दोन दशकांत या परिषदेला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान होते.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग आणि उबरचे अध्यक्ष डारा खोस्रोवशाही हे देखील या परिषदेला येणार आहेत.
 
ही परिषद इतकी महत्त्वाची का?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना जागतिक परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.
 
दावोस मध्ये दरवर्षी ही परिषद भरते. या परिषदेसाठी राजकारण, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून अनेक लोक हजेरी लावतात.
 
अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेकडे गुंतवणुकीची आणि नव्या करारांची संधी म्हणून पाहतात.
 
अनेक उच्चभ्रू लोक जागतिक पातळीवर स्वत:चा अजेंडा पुढे नेण्यासाठी या परिषदेचा वापर करतात. गेल्या वर्षीची प्रिंस विलियम्स यांचं भाषण असो किंवा पर्यावरणाविषयी डेविड अॅटनबर्गचं पर्यावरणाविषयीचं भाषण ऐका.
 
दावोसला कोण कोण जातं?
या परिषदेला साधारणपणे 3000 लोक हजेरी लावतात. त्यातील एक तृतियांश लोक उद्योग क्षेत्रातील असतात. तिथे जाण्यासाठी तुम्हाला आमंत्रण लागतं. तरंच या परिषदेत तुम्हाला फुकटात हजेरी लावता येईल. नाही तर तुम्ही या फोरमचे सदस्य असणं गरजेचं आहे. जर तुम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सदस्य नसाल तर या परिषदेची फी 480,000 पाऊंड इतकी आहे.
 
युकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, फेसबुकचे अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांसारखे मान्यवर इथे कायमच हजेरी लावतात.
 
दावोसवर टीका होते का?
या सोहळ्याला फक्त शक्तिशाली नेतेच हजेरी लावत नाहीत. गेल्यावर्षी प्रसिद्ध इतिहासकार रटगर ब्रेगमन यांनी चर्चासत्रातील लोकांवर कर न भरण्याबाबत ताशेरे ओढले. दावोस आणि स्वित्झर्लंडच्या मोठ्या शहरात या परिषदेच्या वेळी कायमच निदर्शनं होत असतात.
 
युक्रेनची कार्यकर्ती फेमेन ने या परिषदेत स्त्रियांचा अत्यल्प सहभाग असल्याबाबत निदर्शनं केली होती. एप्रिल 2012 मध्ये Occupy wall street नावाने एक चळवळ चालवण्यात आली होती. असमानतेविरोधात ही चळवळ होती.
 
दावोस फक्त उच्चभ्रूंसाठीच आहे का?
2007-08 मध्ये आलेल्या मंदीत दावोसला जाणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायचं. मात्र काही टीकाकारांनी त्याला एक जागतिक प्रतिष्ठेचं प्रतीक केलं.
 
गेल्यावर्षी टाइम मासिकाचे संपादक आनंद गिरीधारीदास यांनी दावोसचं वर्णन करताना, "ज्यांनी आधुनिक जगाचा नाश केला त्या लोकांचं हे गेट टुगेदर आहे" अशी टीका केली होती.
 
जे लोक या परिषदेत जातात त्यांनाही सगळीकडेच जाता येतं असं नाही. प्रत्येकाला एक विशिष्ट रंगाचा बॅज देण्यात येतो. त्यानुसार कुणाच्या भेटीगाठी घेता येतील हे ठरतं.
पांढऱ्या रंगाचा बॅज हा सगळ्यात उच्चभ्रू असतो. त्यावर एक होलोग्रामही असतो. त्या लोकांना सगळीकडे जाता येतं. काही जणांकडे हॉटेल बॅज असतो, हा या रंगांच्या रांगेत सगळ्यांत शेवटचा बॅज असतो. त्या लोकांना परिषदेत जाताच येत नाही.
 
दावोसची परिषदेत पुरुषांची संख्या अधिक असते. गेल्यावर्षी तिथे 22 टक्के महिला होत्या. 2015 मध्ये हे प्रमाण 17 टक्के होतं.
 
परिषदेची जागा, सातत्याने घोंगावणारे हेलिकॉप्टर्स, तसंच उच्चभ्रू पार्ट्या यामुळे ही परिषद एकदम खास वाटते.
 
फायनान्शिअल टाइम्स चे अर्थविषयक विषयाच्या विश्लेषक मार्टिन वोल्फ म्हणतात, "उच्चभ्रू लोक मुख्य प्रवाहात नसतात. हा त्यांचा स्वभाव आहे. पण त्यांच्याशिवाय हे जग चालणं शक्य नाही. त्यामुळे हे लोक सातत्याने भेटणं आणि बोलणं महत्त्वाचं आहे."
 
दावोसने काय साध्य केलं?
अनेक कंपन्या या परिषदेचा वापर महत्त्वाच्या निर्णयासाठी करतात. या परिषदेमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. 1988 टर्की आणि ग्रीस मधील वाद मिटला, तर 2000 मध्ये Global Alliance for Vaccines and Immunization (GAVI) ने रोगराईपासून मुलांना वाचवण्यासाठी लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली.
 
यावर्षी काय साध्य होणार?
डोनाल्ड ट्रंप हे यावर्षीचं मुख्य आकर्षण आहे. ते मागच्या वर्षी या परिषदेला हजर नव्हते. ते मंगळवारी या परिषदेत भाषण करतील. त्याच दिवशी त्यांच्याविरोधात होणाऱ्या महाभियोगाची सुनावणी होईल.
ग्रेटा थनबर्ग पर्यावरणाच्या विषयावर या वर्षीही काहीतरी प्रभावी भाषण करू शकते. तिने आल्प्स ते दावोस ट्रेकिंग करत आली आहे. यावेळी तिने सार्वजनिक वाहतुकीचा वापर केलेला नाही.
 
तसंच फिनलँडच्या पंतप्रधान सान्ना मरिन या वर्षीच्या आकर्षण असतील. तसंच दीपिका पादुकोणही तिचा डिप्रेशनशी लढा उलगडणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments