Marathi Biodata Maker

खूप खातो म्हणून 'या' माणसाला रेस्टॉरंटने नाकारला प्रवेश!

Webdunia
शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (20:03 IST)
आपण खूप मोठ्या प्रमाणात खात असल्याने आपल्याला एका ग्रील बफे रेस्टॉरंटने प्रवेश नाकारल्याचं एका चायनीज व्यक्तीने म्हटलंय. ही व्यक्ती खाद्यपदार्थ विषयक लाईव्ह स्ट्रीमिंग करते.
'मि. कांग' या नावाने या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरला ओळखलं जातं. चीनमधल्या चांगशा शहरातल्या हांदादी सीफूड बार्बेक्यू बफे (Handadi Seafood BBQ Buffet) रेस्टाँरंटने आपल्याला यायला बंदी घातल्याचं कांग यांनी हुनान टीव्हीशी बोलताना सांगितलं. इथे कांग आधी काहीवेळा येऊन गेलेले होते.
पहिल्या भेटीत त्यांनी या रेस्टॉरंटमध्ये दीड किलो पोर्क खालंल, तर नंतरच्या एका भेटीत त्यांनी 3.5 ते 4 किलो कोळंबी खाल्याचं कांग यांनी सांगितलं.
जास्त खाण्याची क्षमता असणाऱ्या लोकांबाबत हे रेस्टॉरंट भेदभाव करत असल्याचं कांग यांनी सांगितलं.
"मी खूप खाऊ शकतो....यात चूक काय आहे?" असं विचारतानाच सोबतच आपण अन्न अजिबात वाया घालवत नसल्याचं ते सांगतात.
पण कांग आपल्या हॉटेलमध्ये जेवल्याने आपल्याला तोटा होत असल्याचं या रेस्टॉरंटच्या मालकांनी हुनान टीव्हीला सांगितलं.
"दरवेळी ते आले की, माझं काही शे युआनचं नुकसान होतं," त्यांनी सांगितलं.
"अगदी ते सोयामिल्कही 20 ते 30 बाटल्या पितात. पोर्क खायला सुरुवात केली की आख्खा ट्रे संपवतात आणि कोळंबीबद्दल बोलायचं झालं तर सहसा लोकं चिमट्याने प्रॉन्स वाढून घेतात. ते आख्खा ट्रे उचलून टेबलवर नेतात."
फक्त मि. कांगच नाही तर सगळ्याच लाईव्ह स्ट्रीमर्सना आपण रेस्टॉरंटमध्ये यायला मनाई केल्याचं हॉटेलचे मॅनेजर सांगतात.
चीनमधल्या सोशल मीडियावर सध्या ही कहाणी प्रचंड ट्रेंड होतेय. वीबो (Weibo) वर आतापर्यंत 25 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा व्हीडिओ बघत त्यांची मतं मांडली आहेत.
काहींच्या मते जर रेस्टॉरंटला परवडणारं नसेल तर मुळात त्यांनी अमर्याद खाण्याची (Unlimited Buffet) ऑफर देऊ नये, तर काहींनी या रेस्टॉरंटच्या मॅनेजरची दया येत असल्याचं म्हटलंय.
चीन सरकारने गेल्यावर्षीपासून खाद्यपदार्थ विषयक व्हिडीओज तयार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई करायला सुरुवात केलीय. हे असे व्हिडिओज लवकरच चीनमध्ये बॅन होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये असलेला अन्नपदार्थांचा तुटवडा लक्षात घेत वाया जाणाऱ्या अन्नाचं प्रमाण लोकांनी कमी करावं असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments