Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतदान : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या आणि ताजे अपडेट्स

Webdunia
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.


महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्याबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही याच दिवशी होत आहे.
 
सकाळी 8.52 - परळी नाट्यावर बोलण्यास सुप्रिया सुळे यांचा नकार मी यंदा परळीला प्रचाराला गेले नाही, त्यामुळे तिथल्या परिस्थतीवर भाष्य करणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. बीबीसी मराठसाठी हलिमा कुरेशी यांनी त्यांना परळीत मुंडे भाऊबहिणीमध्ये सुरू असलेल्या वादावर विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
सकाळी 9 - सांगलीत मतदान केंद्राबाहेर पाणी
 
सांगलीतल्या उमदी मतदान केंद्राबाहेर असं पाणी साचलं आहे. उमदी हे सांगली जिल्ह्यातल्या जत या दुष्काळी भागात आहे. जतच्या भोर नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे.
#AssemblyElections2019 #MaharashtraAssemblyPolls #विधानसभानिवडणूक2019 #Maharashtra pic.twitter.com/dgGOIXs5FT
< — BBC News Marathi (@bbcnewsmarathi) October 21, 2019 >महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्याबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही याच दिवशी होत आहे.

सकाळी 8.52 - परळी नाट्यावर बोलण्यास सुप्रिया सुळे यांचा नकार
मी यंदा परळीला प्रचाराला गेले नाही, त्यामुळे तिथल्या परिस्थतीवर भाष्य करणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. बीबीसी मराठसाठी हलिमा कुरेशी यांनी त्यांना परळीत मुंडे भाऊबहिणीमध्ये सुरू असलेल्या वादावर विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
 

 
पंतप्रधान मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमध्ये ट्वीट करून सर्वांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.
सकाळी 7.11 - उदयनराजेंचे मतदान
साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूकसुद्धा होत आहे. त्यासाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7 - महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात
राज्यात ठिकठिकाणी मतदानासा सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काठेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
 
नागपूरमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी रिंगणात आहेत.
 
मतदानासाठी यंदा राज्यात एकूण 96,661 मतदानकेंद्रं उभारण्यात आली आहेत, तर 1,35,021 VVPAT मशीन असतील.
 
सकाळी 6.30 - मुंबई परिसरात तुरळक पाऊस
मुंबई आणि परिसरात आजच्या मतदानाच्या दिवशीसुद्धा तुरळक पाऊस पडत आहे. राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
नाशिक, अहमदनगर परिसरात सुद्धा तुरळक पाऊस सुरू आहे.
 
रात्री 10.30 वाजता - पाहा महाराष्ट्राची लढत आकड्यांमध्ये
 
रविवारी रात्री 8.30 वाजता - मतदान केंद्रांची तयारी
मुंबईतील धारावी परिसरात मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे.
 
संध्याकाळी 7 वाजता - 'मतदानकेंद्रांभोवतीची इंटरनेट सेवा बंद करा'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव गरजे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून 'मतदानकेंद्रांभोवतीची इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची' विनंती केली आहे.
 
NCPने ट्वीट केलेलं पत्र
"EVM आणि VVPAT मशीन हॅक होऊ शकतात. त्यामुळे आपलं मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नाही, अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेला आजही आहे. हे हॅकिंग मोबाईल नेटवर्कने होतं, त्यामुळे मतदानकेंद्रं आणि आणि जिथे मतपेट्या ठेवल्या जातील, त्या स्ट्राँगरूमभोवतीच्या 3 किमी परिघातील सर्व मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात याव्या," असं या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments