Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सफर मनोहारी कोला बीचची

cola beach
Webdunia
मंगळवार, 9 मार्च 2021 (14:42 IST)
गोवा हे प्रसिद्ध टूरिस्ट टेस्टिनेशन. इथल्या समुद्रकिनार्‍यांवरनिवांत भटकंती करता येते. समुद्रात मनसोक्त डुंबता येतं. ‘फुल टू धम्माल' करण्यासाठी गोव्यासारखं उत्तम ठिकाण नाही. गोव्यात सगळं काही आहे. इथल्या नागमोडी रस्त्यांवरून बाईक चालवण्याचा आनंद वेगळाच. गोव्यातले शांत आणि रम्य समुद्रकिनारे मन मोहवून टाकतात. इथे काही काळ घालवल्यानंतर मन कसं प्रसन्न होऊन जातं. आपण नव्या उत्साहाने कामाला लागतो. गोव्यातले अनेक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. विविध बीचवर पर्यटकांचा गजबजाट पाहायला मिळतो. मात्र याच गोव्याच्या कुशीत दडलेली काही रत्नं या गजबजाटापासून, कोलाहलापाहून दूर आहेत. असंच एक रत्न म्हणजे कोला बीच.

कोलाची गणना गोव्यातल सुंदर आणि आकर्षक बीचमध्ये होते. विशेष म्हणजे इथे शांतता असते. तुम्हालाही गजबजाटापासून काही काळ लांब राहायचं असेल तर गोव्याला या आणि कोला बीचला भेट द्या. या बीचलगत महागडी रिसॉर्टस्‌ किंवा हॉटेल्स नाहीत मात्र तुमच्यासाठी तंबूची सोय होऊ शकते. साधं पण चविष्ट जेवण मिळू शकतं. कोला हा स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. इथल्या निळ्याशार समुद्रात पोहण्याची हौस भागवता येईल. या बीचवर कयाकिंगची सुविधा आहे. कयाकिंगची गणना धाडसीखेळांमध्ये केली जाते. वेगळा अनुभव म्हणून कयाकिंग करता येईल. या बीचवर सूर्यास्ताचं मनोहारी दर्शन घडतं.

कोला हा गोव्यातला सर्वोत्तम बीच असल्याचं म्हटलं जातं. हा समुद्रकिनारा छोटेखानी टेकड्यांनी वेढलेला आहे. भरपूर झाडी असणार्‍या या टेकड्यांमुळे समुद्रकिनार्‍याच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. गोव्यातल्या विविध समुद्रकिनार्‍यांवरून सूर्यास्ताचं दर्शन घडत असलं तरी कोलाचा सूर्यास्त वेगळाच आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे इथला सूर्यास्त खास ठरतो. या बीचवरची सोनेरी वाळू आपल्याला आकर्षित करते. या वाळूवर नुसतं बसून राहिलं तरी खूप छान वाटतं. पणजीहून कोला बीचला जायला दोन तास लागतात. या प्रवासादरम्यान वेगळाच निसर्ग तुम्हाला खुणावत असतो.

सुहास साळुंख

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भूल चुक माफचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार रावचे लग्न हळदीच्या सोहळ्यावर अडकले

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती

जर्मनीतील म्युनिकच्या रस्त्यावर अनुपम खेर गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल

चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

नवाजुद्दीनचा 'कोस्टाओचा टीझर रिलीज

आंजर्ले येथील प्राचीन दुर्गा देवी मंदिर

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूड चित्रपटात जॅक एफ्रॉनसोबत दिसणार

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी अभिनेता हर्षद अतकरी

पुढील लेख
Show comments