Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tourism पर्यटन आणि त्याचे महत्त्व मराठी निबंध

Webdunia
पर्यटन म्हणजे प्रामुख्याने करमणूक आणि हेतूंसाठी प्रवास करणे आहे.पर्यटन हे अनेक प्रकारचे असू शकते. घरगुती पर्यटनामध्ये त्याच देशातील रहिवासी त्यांच्या स्वत: च्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात. जेव्हा दुसर्‍या देशातील रहिवासी आपल्या देशात येतात त्याला अंतर्देशीय किंवा इन बाउंड पर्यटन म्हटले जाते.
परदेशी पर्यटन जेव्हा आपल्या देशातील रहिवासी दुसर्‍या देशात जातात तेव्हा.ते परदेशी पर्यटन किंवा आऊट बाउंड पर्यटन  म्हटले जाते.

पर्यटन हा फक्त एक विरंगुळा आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापच नाही तर एक व्यवसाय देखील आहे.जे पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करते .करमणूक करते,आणि आपल्या देशाला उत्पन्न मिळवून देते.
पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी  मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते.
 
पर्यटनाचे महत्त्व -
 
1 आर्थिक प्रगती - पर्यटन उद्योगमुळे  परकीय मुद्रेचा साठा करण्यात मदत मिळते.त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन उत्पन्न करण्यास मदत मिळते.दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भारत आणि इतर ठिकाणांना भेट देतात.ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेथे राहतात आणि तिथल्या दुकानात खरेदी करतात.या सर्व गोष्टी परदेशी मुद्रेसाठी किंवा चलनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते.वैश्विक मंदी असून देखील पर्यटनामध्ये टक्केवारी वाढ झाली आहे.
 
2  उत्पन्नाचा स्त्रोत - पर्यटन हे सार्वजनिक आणि खाजगी उत्पन्नाचे निरंतर  स्त्रोत आहे. सरकारने विविध प्रकारचे कर लावले आहे याला सरकारी महसूल म्हणतात या करांद्वारे मिळविलेले उत्पन्न हे सार्वजनिक उत्पन्न आहे.जे विक्रेता स्थानिक वस्तुंनी नफा मिळवतो त्याला वैयक्तिक उत्पन्न म्हणतात.पर्यटन रोजगार निर्मित मध्ये देखील मदत करतो. यामुळे हॉटेल उद्योग,आतिथ्य उद्योग,सेवा क्षेत्र ,करमणूक,आणि परिवहन उद्योगात रोजगाराची संधी मिळाली.
 
3 इंफ्रास्ट्रक्चर चा विकास - आपण कधी या कडे लक्ष दिले आहे का की,एखाद्या ठिकाणाला जेव्हा पर्यटन स्थळ घोषित केले जाते तेव्हा त्या ठिकाणचे  लक्षणीय परिवर्तन होते.पर्यटन हे धरणं,रस्ते, कनेक्टिव्हिटी, विमानतळ सुधारणे आणि पर्यटकांना एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भेट देण्यास मदत करते .या मुळे पर्यटनाचा इन्फ्रास्ट्रक्चर चा विकास होण्यास  मदत मिळते.
 
4 सामाजिक प्रगती - सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटन हा एक उत्तम मार्ग आहे. हे नवीन प्रगतीपथावर भेट देताना पर्यटक एकमेकांना आदर, सहिष्णुता आणि प्रेम दर्शविणे शिकवते त्यामुळे हे  सामाजिक प्रगतीस प्रोत्साहित करते.
 
5 सांस्कृतिक वारसा- पर्यटन आपल्या देशातील सौंदर्य, कला, इतिहास आणि संस्कृती दर्शविण्यास मदत करते.कोणत्याही देशातून येणारे वेगवेगळे लोक त्यांच्या सह सुंदर आणि सांस्कृतिक संकल्पना घेऊन येतात.आणि त्या संकल्पना वेगवेगळ्या ठिकाणी पसरवतात.अशा प्रकारे स्थानिक कौशल्यता,भाषा आणि कलेला पर्यटनामुळे वाव मिळतो.आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो.
 
निष्कर्ष - पर्यटन देशात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करतो. तसेच येण्याचे निमंत्रण देखील देतो.हे आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मदत करतो.रोजगाराची निर्मिती करतो.
 
पर्यटन हे सांस्कृतिक देवाणघेवाणसाठी एक उत्तम मार्ग आहे.म्हणून देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहित केले पाहिजे.कारण पर्यटन जगातील सौंदर्याला शोधण्याची सुविधा मिळवून देतो.
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार 'खास',आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

रणवीर सिंगच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी अपडेट, आरोपींना नोटीस

'छावा' च्या सेटवरुन लीक झाला विकी कौशलचा लुक, छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात दिसले

सलमान खान प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई पोलिसांनी तापी नदीतून दोन पिस्तूल आणि गोळ्या जप्त केल्या

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

पुढील लेख
Show comments