Festival Posters

एकही रस्ता नसलेले अनोखे शहर

Webdunia
पेरुतील नैने आणि इटाया या नद्यांच्या संगमावर वसलेले इक्विटोस  अमेझॉन खोर्‍यातील सगळ्यात प्रमुख बंदर आहेच, शिवाय देशातील सगळ्यात मोठे जंगलांचे शहर म्हणूनही त्याची ओळख आहे. या शहराच्या एका बाजूस घनदाट वर्षावने आहेत, तर दुसरीकडे सर्वत्र पाणीच पाणी आहे. त्यामुळे इक्विटोसला पोहोचण्यासाठी हवाई मार्ग किंवा मग होड्यांची मदत घ्यावी लागते. कारण तिथे रस्ता शोधूनही सापडणार नाही. होडीच्या प्रवासासाठी एक आठवडा लागतो व तो तुम्हाला अमेझॉनच्या प्रचंड उकाडा असलेल्या वातावरणातून करावा लागतो. या अनोख्या शहराची एकूण लोकसंख्या सव्वाचार लाख आहे. युरोपीय मिशनरी तिथे येऊन राहण्याआधी ही जागा हजारो वर्षांपासून स्थानिक व पिढीजात शिकारीचा व्यवसाय असलेल्या लोकांचे निवासस्थान होते. तेव्हा हे लोक नदीकिनारी छोट्या वस्त्या करून राहतात. काहींच्या ते, 18 व्या शतकाध्ये ख्रिश्ती मिशनरींनी हे शहर स्थापन केले होते. दुसरीकडे काहीजण मात्र एक शतकापूर्वी या शहराचे अस्तित्व नव्हते असे सांगतात. त्यामागे असा तर्क दिला जातो की, 19 व्या शतकात रबराचा शोध लागला व त्यानंतरच रबराच्या माध्यमातून पैसे कमविण्याची स्पर्धा सुरू झाली. युरोपीय पुरुषांनी स्थानिक महिलांशी विवाह करत तिथे बस्तान मांडले. त्यांच्यातील अनेकजण पुढे रबराचे मोठे उद्योजक झाले. या शहरात भलेही एकही रस्ता नसेल, पण तिथे मोटारसायकल व मोटोकोरोसची कमतरता नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

सलमान खानच्या गाडीत गणेशमूर्ती दिसली, चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली

Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

पुढील लेख
Show comments