Festival Posters

लेपाक्षी मंदिर अनंतपूर

Webdunia
सोमवार, 7 जुलै 2025 (07:30 IST)
भारताला अद्भुत इतिहास लाभलेला आहे. भारतात अनेक अशी प्राचीन मंदिरे आहे. ज्यांचा इतिहास अतिशय अद्भुत आणि आकर्षक आहे. देशात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यामुळे भारतभूमीला मंदिरांचा देश असेही म्हणतात. तसेच या प्राचीन  मंदिरांची भव्यता आणि इतिहासही खूप रंजक आहे.  तसेच दक्षिण भारतात एक असे मंदिर असून त्या मंदिरात एक रहस्यमयी खांब आहे. जो खांब अजूनही हवेत लटकलेला आहे. यामागचे गूढ आजपर्यंत कोणालाही उकलता आलेले नाही. व हे मंदिर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असून या मंदिराचे नाव लेपाक्षी मंदिर आहे.  हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला नक्कीच भेट द्या. 
 
लेपाक्षी मंदिर- 
दक्षिण भारतात असलेल्या या अद्भुत आणि अनोख्या मंदिराचे नाव लेपाक्षी मंदिर असून हे अद्वितीय स्तंभ आकाशस्तंभ म्हणूनही ओळखले जाते. तसेच या मंदिरात एक रहस्यमयी खांब आहे जो हवेमध्ये लटकलेला आहे. हा खांब जमिनीपासून वर उभा आहे. मान्यतेनुसार खांबाखालून काहीतरी बाहेर काढल्याने घरात सुख-समृद्धी येते. या कारणास्तव अनेक लोक या खांबाच्या खालून कपडे काढतात.
 
तसेच लेपाक्षी मंदिरात भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या वीरभद्राची पूजा केली जाते. याशिवाय या मंदिरात अर्धनारीश्वर, कंकाल मूर्ती, दक्षिणामूर्ती आणि त्रिपुरांतकेश्वर या रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की हे मंदिर 16 व्या शतकात विरुपण्णा आणि विरन्ना नावाच्या भावांनी बांधले होते. व पौराणिक आख्यायिकेनुसार हे मंदिर अगस्त्य ऋषींनी बांधले होते. या मंदिराबाबत स्थानिक रहिवासी सांगतात की, या ठिकाणी रावणाने जटायूचा वध केला होता. त्यावेळी भगवान रामाची पक्षी जटायूची पहिली भेट झाली होती.  तेव्हापासून या गावाचे नाव लेपाक्षी झाले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

ड्रामा, टास्क आणि ट्विस्ट्सचा जल्लोष – बिग बॉस मराठी 6 मधील 5 अविस्मरणीय क्षण!

अक्षय कुमारचा मुलगा आरव वयाच्या २३ व्या वर्षी करत आहे नोकरी; पगार ऐकून धक्का बसेल

कळीचा मुद्दा.. कुटुंबप्रमुख कोण..? नुसतं एव्हढंच विचारलं

चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे, संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

जन नायकन'नंतर आता रजनीकांतचा 'जेलर २' लीक झाला , निर्मात्यांनी चाहत्यांना कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला

पुढील लेख
Show comments