Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे मिनी स्वित्झर्लंड, जाणून घ्या कुठे आहे? या सुट्ट्यांमध्ये फिरायला नक्की जा

Webdunia
शनिवार, 9 मार्च 2024 (05:00 IST)
स्वित्झर्लंड पहायला जाण्याकरिता पासपोर्ट, वीजा सोबत पुष्कळ पैसे देखील असावे लागतात. सामान्य कुटुंबासाठी स्वित्झर्लंडला जाणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही. पण भारतातच जर स्वित्झर्लंड सारखे सुंदर दृश्य पाहण्यास मिळत असतील तर स्वित्झर्लंडला जायची गरज नाही. भारतात हे सुंदर दृश्य तुम्हाला कमी पैश्यात पाहण्यास मिळतील. हे दृश्य मिनी स्वित्झर्लंडच्या नवाने चर्चित हिल स्टेशनवर पाहण्यास मिळतात. दिल्लीच्या जवळ भारताचे मिनी स्वित्झर्लंड एवढे सुंदर आहे की दुसऱ्या देशातील लोक देखील येथील सौंदर्य पाहण्यास येतात. चला तर जाणून घेऊ या भारताचे मिनी स्वित्झर्लंड कुठे आहे आणि तिथे कसे जावे.  
 
भारताचे मिनी स्वित्झर्लंड कुठे आहे? 
भारतच्या उत्तराखंडमध्ये चमोली मध्ये असलेले औली हिल स्टेशनला  'मिनी स्विट्जरलैंड' बोलले जाते. औली भारताची सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे. येथील हवा आणि पर्वत पाहून तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही खरच स्वित्झर्लंड मध्ये प्रवास करत आहात. सृष्टीचे हे नैसर्गिक रूप पाहण्यासाठी दरवर्षी इथे हजारांपेक्षा पर्यटक येतात. बर्फवार स्कीइंगचा आनंद घेण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. 
 
औलीला उत्तरखंडचा स्वर्ग बोलले जाते. जो पूर्ण जगभरात चांगल्या स्की रिजाॅर्ट च्या रुपात प्रसिद्ध आहे. बर्फाची पंढरी चादर ओढलेल्या पर्वतानवर सूर्योदयपासून तर सूर्यस्तापर्यंत दृश्य बघण्या सारखे असतात. औली हे प्रत्येक वेळी आपल्या वेगळ्या रंगमध्ये सुंदरतने नटलेला दिसतो. औली एकमात्र जागा आहे, ज्याला एफआइएस ने स्कीइंग रेससाठी अधिकृत केले आहे. स्कीइंगसाठी औलीमध्ये 1300 मीटर लांब स्की ट्रैक आहे. आशियातील सर्वात लांब रोपवे काश्मीर मधील गुलमर्गला मानले जाते. तर दुसऱ्या नंबरवर औली-जोशीमठ रोपवे आहे. 1982 मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी कमीतकमी  4.15 किलोमीटर लांब या रोपवेची आधारशिला ठेवली होती आणि 1994 मध्ये हे  बनुन तयार झाले होते. औलीमध्ये रोपवेने तुम्ही दर्यानमधील सुंदरता बघू शकतात. 
 
कसे जायचे औलीला? 
दिल्ली पासून 320 किलोमीटर दूर असलेले पर्वत आणि हिरवळीने घेरलेले या स्थान वर  जाण्याकरिता देहरादून पर्यंत रेल्वे, बस परिवहन ने जाऊ शकतात. पुढचा रस्ता रोड मार्गाने केला जाऊ शकतो, त्याच्यासाठी उत्तराखंड परिवहनची स्थानीय बस किंवा  दूसरे वाहनने औली पर्यंत पोहचता येते. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला आग, मौल्यवान वस्तू जळून खाक

प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले

यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

पुढील लेख
Show comments