Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतातील सर्वात सुंदर आणि भीतीदायक,सुंदरबन अभयारण्य

Webdunia
बुधवार, 30 जून 2021 (18:14 IST)
भारताच्या जंगलात हत्तीचे ओरडणे,मोराचा नाच,उंटाची सैर,सिंहाची गर्जना,पक्ष्यांची किलबिलाहट ऐकायला आणि बघायला मिळते.भारतात वन्यप्राणी मोठ्या संख्येत आहे.इथे वन्य प्राणी बघायला देश-परदेशातून लोक येतात. भारतात पक्षी अभयारण्या व्यतिरिक्त 70 हून अधिक राष्ट्रीय उद्याने आणि 500 ​​हून अधिक वन्यजीव अभयारण्य आहेत.चला या वेळी पश्चिम बंगालमधील सुंदरबन राष्ट्रीय अभयारण्या विषयी जाणून घेऊ या.
 
1 सुंदरबन अभयारण्य हे पश्चिम बंगाल(भारत)आणि बांगलादेशाची सीमा व्यापते. असा अंदाज आहे की हे सुंदरबन जंगल1,80,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. 
 
2 भारतीय सीमेत येणार्‍या जंगलाच्या भागास सुंदरबन नॅशनल पार्क असे म्हणतात. हे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात आहे. सुंदरवन 38,500 चौरस किलोमीटर क्षेत्र  व्यापते.
 
3 सुंदरबन नाव हे 'सुंदरी का वन 'मधून घेतले आहे.हे येथे आढळणाऱ्या मौल्यवान मोठ्या मँग्रोव्ह शी संबंध आहे.येथे मोठ्या संख्येने सुंदरीचे झाडे आढळतात.यांच्या नावावरच सुंदरबन ठेवले आहे.
 
4 बंगालच्या उपसागरात हुगली नदीच्या (शरत)पासून मेघना नदी (बांगलादेश)च्या  260 किमी पर्यंत पसरलेला एक विस्तृत घनदाट अरण्याच्या दलदलीचा भाग,जे गंगा डेल्टाचा खालचा भाग आहे.हे क्षेत्र 100-130 किमी मध्ये पसरलेले अंतर्स्थलीय क्षेत्र आहे.जगातील सर्वात मोठा डेल्टा,10,200 चौरस किमी मध्ये पसरलेला आहे.
 
5 सुंदरबन हे भारताच्या 14 बायोस्फीयर रिजर्व्ह पैकी एक आहे.वर्ष 1989 मध्ये सुंदरबन क्षेत्राला बायोस्फीयर रिजर्व्ह घोषित केले गेले.
 
6  सध्याचे सुंदरवन नॅशनल पार्क हे 1973 मध्ये सुंदरबन टायगर रिजर्व्हचे प्रमुख क्षेत्र आणि 1977 मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित केले.4 मे 1984 रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.सन 1987मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये या उद्यानाचाही समावेश केला आहे.
 
7 अनेक दुर्मिळ आणि प्रसिद्ध वनस्पती आणि बंगाल टायगरच्या निवास स्थानामुळे सुंदरवनाला 'सुंदरबोन' देखील म्हणतात,हे भारत आणि बांगलादेशात स्थित जगातील सर्वात मोठी नदी डेल्टा आहे.ही डेल्टा बंगाल टायगर साठी सर्वात मोठ्या रिजर्व्ह पैकी एक आहे. 
 
8 येथे,पक्षी,सरपटणारे प्राणी आणि इन्व्हर्टेब्रेट प्रजातींच्या प्राण्यांबरोबरच खारट पाण्याचे प्राणी देखील दिसू शकतात.रानटी कोंबडा,मोठा सरडा,ठिपकेदार हरीण, रान डुक्कर,मगर इत्यादी इतर अनेक वन्य प्राणी बघणे आश्चर्यकारक आहे.
 
9 सुंदरबन धोकादायक प्रजाती जसे की बटागूर,बसका,किंग क्रॅब,आणि ऑलिव्ह रिडल कासवाचे वास्तव्य देखील येथे आहे.
 
10 सायबेरियाई बदकांच्या व्यतिरिक्त अनेक परदेशी पक्षी बदलत्या हंगामात वेळो-वेळी इथे येतात.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

Saif Ali Khan: साऊथच्या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान दिसणार

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

पुढील लेख
Show comments