Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tourism - भारतातील सर्वात भव्य मंदिर,यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर

Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (23:21 IST)
भारतात एकापेक्षा एक भव्य आणि आकर्षक मंदिरे आहेत. या मंदिरांचे सौंदर्य आणि भव्यता जगभर प्रसिद्ध आहे. पण असे मंदिर तेलंगणामध्ये बांधण्यात आले आहे, ज्याला भारतातील सर्वात भव्य मंदिर म्हणता येईल. तेलंगणातील टेकड्यांमधील यद्रादी भुवनगिरी येथे काळ्या ग्रॅनाइट दगडापासून बनवलेले लक्ष्मी नृसिंह देवाचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. 
 
हे मंदिर विटा, सिमेंट इत्यादींनी बांधलेले नसून. मंदिराच्या बांधकामात सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या मंदिरात नरसिंहाची मूर्ती आहे. गेल्या वर्षीच या मंदिराची पुनर्बांधणी केली. चला तर मग या मंदिराचे वैशिष्टये जाणून घेऊ या. 
 
पौराणिक महत्त्व लक्षात घेऊन तेलंगणा सरकारने यदाद्री  लक्ष्मी नरसिंह मंदिर बांधण्याची घोषणा केली होती. या मंदिराच्या बांधकामाचा आराखडा सन 2016 मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर 1900 एकर जमिनीवर ते तयार करण्यात आले.
 
मंदिराचे वैशिष्टये -
या मंदिरात भगवान विष्णूच्या नृसिंह अवताराची मूर्ती आहे, जी संपूर्ण जगात एकमेव मूर्ती आहे. हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी एक असलेल्या स्कंद पुराणात या मंदिराचे आणि नरसिंह अवताराचे वर्णन केले आहे. हजारो वर्षे जुने हे मंदिर आधी 9 एकर जागेत होते, पण जीर्णोद्धारानंतर 1900 एकर जागेवर लक्ष्मी नृसिंह मंदिर बांधण्यात आले आहे.
 
 हे बांधकाम  मंदिराच्या भव्यतेचा आणि समृद्धीचा नमुना आहे.मंदिराच्या बांधकामात काळ्या ग्रॅनाईट दगडाचा वापर केल्याने मंदिराचे सौंदर्य तर वाढवतात.मंदिराच्या गर्भगृहाच्या घुमटात 125 किलो सोने आहे.
 
यदाद्री मंदिराचा इतिहास -
यदाद्री मंदिराचे वर्णन स्कंद पुराणात आढळते. एका आख्यायिकेनुसार, महर्षी ऋषीशृंगाचे पुत्र यद ऋषी यांनी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना नृसिंहाच्या रूपात दर्शन दिले. त्यानंतर भगवान नृसिंह या ठिकाणी तीन रूपात विराजमान आहेत. मान्यतेनुसार, भगवान विष्णूची नृसिंह मूर्ती जगात फक्त याच मंदिरात आहे. मंदिराच्या आत सुमारे 12 फूट उंच आणि 30 फूट लांब 30 गुहा आहेत, तेथे भगवान नृसिंहाच्या तीन मूर्ती आहेत, ज्यामध्ये ज्वाला नृसिंह, गंधभिरंदा नृसिंह आणि योगानंद नृसिंह या मूर्ती आहेत. त्यांच्या सह देवी लक्ष्मीजींची मूर्तीही आहे.
 
यदाद्री मंदिरात कसे जायचे?
या मंदिरात जाण्यासाठी, हैदराबाद विमानतळापासून 60 किमी दूर असलेल्या यदाद्री मंदिरात बस किंवा टॅक्सीने जाता येते. रेल्वेने येताना भुवनगिरी रेल्वे स्टेशनपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments