Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर

Webdunia
रविवार, 30 मे 2021 (17:48 IST)
श्री विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुण्याच्या एका विद्वान कुटुंबात झाला.हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते.त्यांचे वडील श्रीकृष्ण शास्त्री हे देखील एक नामवंत लेखक होते.  
 
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयां मधून त्यांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.त्यांना इतिहास,अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचे तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचे सखोल ज्ञान होते.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकी पेशाची निवड केली.त्यांनी पुण्यातून आणि नंतर रत्नागिरीच्या शाळेमधून अध्यापनाचे काम केले. बी.ए.ची पदवी घेण्यापूर्वी ते आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात होते.ब्रिटिश सरकारच्या धोरण वर या मासिकेत टीका केल्याने हे मासिक बंद पाडण्यात आले. 
 
त्यांनी,आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण होते.त्यांनी एकहाती मजकूर असलेले सुरु केलेले निबंधमाला मासिक सातवर्षे अखंड चालले. या मध्ये  ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले.
 
महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांमध्ये जाणीव असावी व सामान्यजनांची काव्याभिरुची घडविण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले.त्यांनी पुण्यातील आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा स्थापित केले.बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.हे स्थापित करण्याचा उद्देश्य उमलत्या पिढीला राष्ट्रीय शिक्षण मिळावे हा होता.त्यांनी केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रेजी वृत्तपत्र सुरु केली.त्यांच्या मृत्यूनंतर टिळकांनी ती वृत्तपत्रे पुढे चालवली. 
 
17 मार्च 1882 रोजी अवघ्या वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी विष्णुशास्त्री चिपळूणकरांना, मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात.
चिपळूणकर यांनी अनेक सामाजिक कार्य केले त्यामध्ये चित्रशाळा पुणे,किताबखाना पुणे,आर्यभूषण छापखाना,न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन महाविद्यालय स्थापित केले.
 
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे काही प्रकाशित साहित्य -
 *अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी
* आमच्या देशाची स्थिती
* इतिहास
* संस्कृत कविपंचक (सन1891)
* किरकोळ लेख
* केसरीतील लेख
* बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद
* सॅम्युएल जॉन्सन यांच्या द हिस्टरी ऑफ रासेलस (इंग्लिश) या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला.
या व्यतिरिक्त बरेच साहित्य आहे.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments