Festival Posters

लॉकडाउनमध्ये, दीपिका पादुकोण तिच्या चाहत्यांना सर्जनशीलतेसाठी देतेय प्रोत्साहन!

Webdunia
शुक्रवार, 31 जुलै 2020 (14:37 IST)
अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे, ज्याचे नाव आहे 'फॅनआर्ट शुक्रवार'. दीपिकाने 'फॅनआर्ट शुक्रवार' या ट्रेण्डद्वारे तिच्या चाहत्यांनी बनविलेले तिचे खास स्केच पोस्ट करणार असून, चाहत्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी तिने ही मालिका सुरू केली आहे.
 
या ट्रेण्डद्वारे ती चाहत्यांना अधिकाधिक सर्जनशील होण्यासाठी प्रोत्साहित करत असून त्या कलाकाराच्या कलागुणांचे कौतुक करत आहे. चाहत्यांनी पाठवलेले हे स्केचेस दीपिका वैयक्तिकरित्या पाहते, स्केच निवडते आणि दर शुक्रवारी ते पोस्ट करते. नेटिझन्स, चाहते या संपूर्ण प्रक्रियेचा मनापासून आनंद  घेत असून दीपिकासोबत कला निर्मितीसाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत.
 
शुक्रवारच्या या फॅन आर्टसाठी दीपिकाने राहिल गॅलरीने फुललेल्या फुलांचा फोटो शेअर केला आहे. गुलाबी आणि पिवळ्या फुलांच्या पाकळ्यापासून बनविलेली ही एक अतिशय सुंदर कलाकृती आहे. हे रेखाटन पाहताक्षणीच आपले लक्ष वेधून घेते, जसे त्याने दीपिकाचे देखील लक्ष वेधले आहे. हे रेखाटन  खूपच अनोखे आहे आणि म्हणूनच अभिनेत्रीने हे आपल्यासोबत शेअर केले आहे.
 
दीपिका पादुकोण ही अशी अभिनेत्री आहे जी तिच्या चाहत्यांसाठीची कृतज्ञता दाखवण्यासाठीची एकही संधी सोडत नाही. या अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत आणि या ट्रेण्डद्वारे ती देत असलेले प्रोत्साहन या लॉकडाऊनमध्ये तिच्या चाहत्यांची सर्जनशील बाजू बाहेर आणण्यास मदत करत आहे.
 
दीपिकाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर 50 दशलक्षांचा आकडा ओलांडला आहे आणि चाहत्यांच्या या प्रेमाबद्दल ती अत्यंत कृतज्ञ आहे. नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये दीपिका आणि प्रभास हे दोन सुपरस्टार नाग अश्विनच्या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हा पॅन इंडिया बहुभाषिक प्रकल्प असून भव्य प्रमाणात बनविण्यात येण्याची आशा आहे.
 
तसेच, अभिनेत्री शकुन बत्राच्या सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जॉर्जकुट्टी पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यासाठी सज्ज, मोहनलालचा 'दृश्यम ३' या दिवशी थिएटरमध्ये येणार

ओ रोमियो' रिव्ह्यू: शाहिद-तृप्तीचा दमदार अभिनय आणि विशालचा अ‍ॅनिमल हँगओव्हर

राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे ठेवली, त्यांचा आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या

"जय हनुमान" चा भव्य लाँच हम्पीच्या ऐतिहासिक भूमीत होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाची भूमिका साकारणार

राजपाल यादव यांच्या मदतीला सोनू सूद गेले धावून; म्हणाले- इंडस्ट्रीने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

सर्व पहा

नवीन

राजपाल यादव तुरुंगाबाहेर आले ?सलमान खानचे आभार मानतानाच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य जाणून घ्या

बप्पी लाहिरींचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले, इतकं सोनं ते का घालायचे जाणून घ्या

Mahashivratri Special 'पुणेेश्वर' आणि 'नारायणेश्वर' प्राचीन महादेव मंदिर दर्शन

व्हॅलेंटाईन डे ला रिलीज झालेल्या 'एक दिन' च्या रोमँटिक पोस्टरमध्ये जुनैद खान आणि साई पल्लवीची अद्भुत केमिस्ट्री दिसली

पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का निवडले?

पुढील लेख
Show comments