Marathi Biodata Maker

प्रसिद्ध टिव्ही अभिनेता करणवीर बोहरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (21:20 IST)
छोट्या पडयावरील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख असलेला अभिनेता करणवीर बोहरा आता एका प्रकरणात अडकला आहे. या अभिनेत्याबाबत एक गोष्ट उघडकीस आली आहे. एका 40 वर्षीय महिलेने करण आणि त्याची पत्नी तजविंदर सिद्धू यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात करणवीरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेने याबबत वृत्त दिले आहे. एका 40 वर्षीय महिलेने करणवीरवर आरोप केला आहे की, 2.5 % व्याजावर पैसे परत करण्याचे आश्वासन करणवीरने दिले होते. पण त्याने केवळ १ कोटी रुपये परत केले आहे.
 
महिलेने या तक्रारीत आपली ९९ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच, तिच्याकडून सहा जणांनी १ कोटी ९९ लाखांची रक्कम घेतली होती. ही रक्कम २. ५ टक्के व्याजासह परत करण्याचा करार त्यांच्यात झाला होता. मात्र या महिलेला आतापर्यंत फक्त १ कोटी रुपयेच परत करण्यात आले आहे. त्यामुळे बाकीचे पैसे आणि व्याज परत मिळवण्यासाठी या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या महिलेने पुढे म्हटले आहे की, जेव्हा ती करणवीरकडे आपल्या पैशांची मागणी करायला गेली, त्यावेळी करणवीर आणि त्याच्या पत्नीने तिला योग्य प्रतिसाद दिला नाही. तसेच तिला गोळ्या घालण्याची देखील धमकी दिली. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
 
दरम्यान, करणवीर याने कंगना रनौत हिच्या ‘लॉकअप’  या रिॲलिटी शोमध्ये आपल्यावरच्या कर्जाचा खुलासा केला होता. करणवीर याने अनेक कार्यक्रमात आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘एक से बढ़कर एक’, ‘कुबूल है’, ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘नागिन 2’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने अभिनय केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

शाहरुख खान आणि काजोल यांची लंडनच्या ऐतिहासिक लेस्टर स्क्वेअरमध्ये अमर प्रतिमेनंतर प्रतिक्रिया

सलमान खानच्या जबरदस्त लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला, वाढदिवसाच्या महिन्याची सुरुवात स्टाईलने झाली

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

अनुष्का शंकर एअर इंडियावर नाराज, सितार विमान प्रवासादरम्यान तुटली

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'मोहब्बतें' साठी फक्त एक रुपया मानधन घेतले कारण.....

पुढील लेख
Show comments