Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Happy Birthday Helan :दुसऱ्या महायुद्धादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला, विवाहित पुरुषाशी दुसरे लग्न जाणून घ्या बरेच काही

Webdunia
रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (12:34 IST)
बॉलिवूडची जगप्रसिद्ध अभिनेत्री हेलनला कोण ओळखत नाही.  हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आयटम डान्स गर्ल  म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेलनचा आज वाढदिवस आहे. 21 नोव्हेंबर 1939 रोजी बर्मामध्ये जन्मलेल्या  हेलनचे पूर्ण नाव हेलन रिचर्डसन खान आहे.  हेलनचे वडील अँग्लो इंडियन आणि आई बर्मी होती. दुस-या महायुद्धात त्यांचे वडिल निधन पावले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब 1943 मध्ये भारतात स्थायिक झाले. 
हेलनची ओळख 1951 साली 'शबिस्तान'मध्ये कोरस डान्सर म्हणून झाली होती. 
अनेक चित्रपटांमध्ये कोरस गर्ल झाल्यानंतर, हेलनला 'अली लैला' (1953) आणि 'हुर-ए-अरब' (1955) चित्रपटांमध्ये एकल नृत्यांगना म्हणून काम करण्याची संधी मिळाली .
'हावडा ब्रिज' (1958) चित्रपटातील 'मेरा नाम चिन चिन चू' हे गाणे त्याच्या करिअरमधील पहिला मोठा ब्रेक होता.
वयाच्या एकोणीसव्या वर्षी हेलनच्या कारकिर्दीला सुरुवात झाली जेव्हा त्यांना  बंगाली चित्रपट हावडा ब्रिजमधून मोठी संधी मिळाली.
हेलन यांनी दोन लग्न केले. हेलनचे पहिले लग्न वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्याशी झाले होते, त्यांचे लग्न सोळा वर्षे टिकले, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर हेलनने पटकथा लेखक सलीम खान यांच्याशी लग्न केले. सलीम आधीच विवाहित होते तरी सलीमने त्यांना दुसऱ्या पत्नीचा मान दिला. लग्नानंतर त्यांनी अर्पिताला दत्तक घेतले.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अरबाज खान आणि अलविरा खान अग्निहोत्री ही त्यांची सावत्र मुले आहेत.
1960 ते 1970 च्या दशकात त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्य केले.
हेलनने अधिकृतपणे 1983 मध्ये चित्रपटांमधून निवृत्ती घेतली, परंतु 'खामोशी' (1996) आणि 'मोहब्बतें' (2000) सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्यां कलाकाराची भूमिका केली. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

शांत आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ बडा बाग जैसलमेर

अल्लू अर्जुन यांना संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात नियमित जामीन मिळाला

पुष्पा 2' चेंगराचेंगरी प्रकरणावर बोनी कपूरची प्रतिक्रिया, म्हणाले-

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments