Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झुंड : अंकुश गेडाम पोलिस भरतीची तयारी करता करता 'डॉन' कसा बनला?

Webdunia
बुधवार, 23 मार्च 2022 (09:37 IST)
''आधी मी लोकांमध्ये उभा असायचो, आज लोक माझ्यासाठी उभं राहतायेत, याचा खूप मोठा आनंद आहे,'' 'झुंड'मध्ये 'डॉन'ची भूमिका साकारणारा अंकुश गेडाम सांगत होता.
 
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासून त्यातली डॉन, बाबू, संभ्यासारखी अतरंगी पात्रं लोकांना आवडत आहेत. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली, अगदी हालाखीच्या परिस्थितीतली ही पोरं अमिताभ बच्चनसारख्या महानायकासमोर ज्या विश्वासाने उभी राहिली, त्याचं कौतुकच होत आहे.
 
बीबीसी मराठीने अंकुश गेडाम, बाबूचं पात्र साकारणारा प्रियांशू ठाकूर आणि भावनाची भूमिका करणारी सायली पाटील यांच्याशी संवाद साधला.
 
झुंडसाठी निवड झाल्यापासून आता वाट्याला येणाऱ्या कौतुकापर्यंतचा सगळा प्रवास या टीमनं उलडून दाखवला.
 
अंकुशची झुंड ही पहिलीच फिल्म. पोलीस भरतीची तयारी करणारा, चित्रपटांबद्दल फारशी माहिती नसलेला अंकुश 'झुंड'चा 'डॉन' कसा झाला?
अंकुशनं म्हटलं, "मला रस्त्यावरुनच फिल्मसाठी सिलेक्ट केलं होतं. मी गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत होतो. तेव्हा नागराज सरांचे भाऊ भूषण मंजुळे यांनी माझे फोटो आणि व्हीडीओ काढले. मी त्यांना विचारलं की, तुम्ही माझे फोटो का काढले? तेव्हा त्यांनी आम्ही शॉर्टफिल्म बनवणार असल्याचं सांगत मला ऑडिशनला बोलावलं.''
 
भूषण मंजुळेंनीही बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, जवळपास सगळी मुलं मिळाली होती, पण डॉन सापडलाच नव्हता. त्याचं एक चित्र माझ्या डोळ्यांसमोर होतं आणि तसा मुलगाच मिळत नव्हता. नागपूरमधला मुक्काम हलवायची वेळ आली होती. जाऊ दे, पुढच्यावेळेस जाऊ तेव्हा पाहूया असं नागराजनंही म्हटलं. निघण्याच्या आधी असेच गाडीतून फिरत होतो. गणपती विसर्जनाचा दिवस होता. गड्डी गोदामच्या भागातून मिरवणूक चालली होती आणि एक मुलगा मिरवणुकीसमोर नाचत होता. त्याला पाहून मी तिथेच थांबलो.
 
भूषणनं त्याचं वर्णन केलं- त्यानं डोक्यावर खोट्या केसांचा मोठ्ठा विग घातला होता. जर्सी-बर्मुडा घातला होता आणि नाचत होता. त्याच्या पायाला स्प्रिंग लावल्यासारखं वाटत होतं, अंगात लयबद्धता होती...
 
"त्याला तसं पाहिल्यावरच लक्षात आलं की, डॉन सापडला."
 
'मी डॉनची भूमिका करणार हे माहीत नव्हतं'
मी पोलिस भरतीची तयारी करत होतो, सिनेमात दाखवलंय तसं मी कधीही नशा वगैरेही केली नव्हती. अॅक्टिंग पण येत नव्हती, अंकुश सांगत होता.
 
"मला एक सीन दिला. त्यांनी सांगितलं की, तू क्रिमिनल आहेस. मी म्हटलं, असं नाहीये. मग मला समजावलं की तसं समज. तू क्रिमिनल आहे आणि तुला एक वॉचमन आत सोडत नाहीये. मी तो सीन करुन दाखवला. तो सीन त्यांना कदाचित आवडला असेल.
 
मग त्यांनी माझा व्हीडीओ नागराज सरांना पाठवला. त्यानंतर दोन तीन दिवसांनी नागराज सरांनी मला बोलावलं. नंतर मला पुण्याला यायला सांगितलं. आम्हाला पुण्याला स्क्रिप्ट वाचून दाखवली. तेव्हा मला माहित नव्हतं मी डॉनचं काम करणार आहे. ते कळल्यावर मी किती खूश झालो हे सांगू नाही शकत.''
 
आजूबाजूचा संघर्ष, कोलाहलच कदाचित अंकुशनं 'डॉन' साकारताना जिवंत केला, असं सिनेमा पाहताना वाटत राहतं.
सुरुवातीला झुंडचं चित्रिकरण पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर होणार होतं. परंतु काही कारणांमुळे झुंडचा सेट तिथून काढून टाकावा लागला. नंतर ज्या भागातली कथा आहे त्या नागपूरमध्येच सिनेमा शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
नागपूरला जेथे सेट तयार झाला होता, त्याच्या शेजारीच अंकुशचं घर होतं. फिल्ममध्ये म्हटल्याप्रमाणे एक भिंत पार केल्यानंतर एक वेगळीच दुनिया अंकुशची वाट पाहत होती.
 
अंकुश म्हणाला, ''फिल्म रिलिज झाल्यानंतर लोकांचं प्रेम मिळतंय. प्रिमियर शो होता तेव्हा नागपूरला गेलो होतो. तेव्हा माझ्या मित्रांनी सुद्धा माझं स्वागत केलं. आधी मी लोकांमध्ये उभं असायचो आज लोक माझ्यासाठी उभे आहेत याचा खूप मोठा आनंद आहे.''
 
आर्चीच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती, पण...
'झुंड'मध्ये भावनाची भूमिका साकारणाऱ्या सायली पाटीलला सुरुवातीला विश्वासच बसला नाही की तिला ही फिल्म करायला मिळतीये.
 
सायलीने 'सैराट'मधल्या आर्चीच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती. परंतु आर्चीच्या भूमिकेसाठी तिची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर ती तिच्या कामांमध्ये गुंतली होती. चार वर्षांनी अचानक एक दिवस नागराज मंजुळे यांचा तिला फोन आला आणि तिचा झुंडचा प्रवास सुरु झाला.
सायली सांगते, ''सैराटनंतर चार वर्षांनी नागराज सरांचा फोन आला. त्यांनी माझी विचारपूस केली. मला आधी वाटलं माझा कुठला तरी मित्र माझ्यासोबत प्रॅन्क कॉल करतोय. मी पण असंच हो- हो म्हणत बोलले. पण नंतर लक्षात आलं की खरंच नागराज सरांचाच फोन होता.
 
मी नागराज सरांना भेटायला गेले तेव्हा सरांनी मला झुंडबद्दल सांगितलं. मला दोनच प्रश्न विचारले- तुला गाडी चालवता येते का आणि तू कोणता खेळ खेळतेस? दोन्ही मला येत नव्हतं.''
 
''मी जेव्हा मी नागराज सरांना फिल्ममध्ये आणखी कोण आहे हे विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, नवीन चेहरे आहेत आणि अमिताभ बच्चन आहे असं सांगितलं. तेव्हा मला पुन्हा वाटलं हा प्रॅन्क आहे म्हणून. पण ते खरंच होतं.''
 
अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण
अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा दोघांचा अनुभव कसा होता? या प्रश्नाचं उत्तर देताना सायली आणि अंकुशनं सांगितलं की, अमिताभ बच्चन यांनी अगदी मैत्रीचं वातावरण ठेवून समजून घेत आमच्यासोबत काम केलं.
 
अंकुश म्हणाला, ''बच्चन सर आल्यावर सगळे त्यांना सेट दाखवत होते. सगळ्यांची ओळख त्यांना करुन देण्यात येत होती. मी मागे मागे लपत होतो. सगळ्यांची ओळख करून घेतल्यावर बच्चन सरांनी विचारलं की, डॉन कुठे आहे? मी अगदी सगळ्या गर्दीत शेवटी उभा राहिलो होतो. माझ्या छातीत धडधडत होतं. मी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. बच्चन सरांसोबत पहिला सीन झाला तेव्हा त्यांनी जाणवू दिलं नाही की ते किती मोठे अभिनेते आहेत. आमच्या सोबत खूप फ्रेंडली वागायचे.''
सायली सांगते, ''बच्चन सर मला नेहमी 'मोहतरमा' म्हणायचे. मी कधी खेळले नव्हते. त्यामुळे ते सारखे सूचना द्यायचे- उन्हात उभी राहू नकोस, पाणी पी.''
 
अंकुशला आता फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करायची इच्छा आहे. या क्षेत्रात जे काही काम मिळेल ते मी काम करेन, असं तो सांगतो.
 
सिनेमातच काम करायचं का किंवा पुढे काय असा विचार केला नाहीये अजून. जिथे आर्ट आणि क्रिएटिव्हिटी आहे, तिथे काम करण्याची इच्छा आहे, असं सायली सांगते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार झाशीचा किल्ला

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

पुढील लेख
Show comments