Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?

kangna ranaut
Webdunia
शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (21:23 IST)
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. कंगना सध्या तिच्या कुल्लू येथील घरी राहत आहे. तिच्या म्हणण्यानुसार गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमाराला तिच्या घराबाहेर बार ऐकू आले. आधी तिला ते फटाके असावेत असं वाटलं. मात्र, या मोसमात पर्यटक कुलुमध्ये येत नाहीत, त्यामुळे हा परिसर शांत असतो. त्यामुळे कंगनाने तिच्या सुरक्षा रक्षकाला बोलावलं. मात्र, त्याला कदाचित गोळीबाराचा आवाज नवीन असेल, म्हणून तो ते ओळखू शकला नाही, असं कंगनाचं म्हणणं आहे.
 
कंगनासोबत त्यावेळी चार अन्य कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर कंगनाने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कदाचित कुणीतरी वटवाघुळाला मारण्याचा प्रयत्न करत होतं. वटवाघुळांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. त्यामुळे आम्ही स्थानिक शेतकऱ्याला बोलवलं. मात्र, त्याने गोळीबार केला नसल्याचं म्हटल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे जाणूनबुजून मला घाबरवण्यासाठी केलं जात असल्याचा दावा कंगनाने केला आहे.
 
कंगनाच्या घराच्या आसपास अशा कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत, जे गोळीबार झाल्याची पुष्टी करू शकतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली

उत्तराखंडमधील औली या ठिकाणी स्वर्गात असल्यासारखे वाटते

मलायका अरोराला न्यायालयाचा इशारा, अजामीनपात्र वॉरंट जारी होऊ शकते, काय आहे प्रकरण?

'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर अनुष्काचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले

पुढील लेख
Show comments