Marathi Biodata Maker

20 अंगरक्षक करणार करिनाची सुरक्षा

Webdunia
तैमूरच्या जन्मानंतर पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बाळंतपणानंतर वाढलेले वजन कमी करुन करिना कपूर खान आता सज्ज झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती ‍अनिल कपूर यांची कन्या रिया कपूर, निर्माती एकता कपूरबरोबर करीत आहे. सोनम कपूर यात प्रमुख भूमिकेत असणारच आहे.

सोनमसोबतच मुख्य भूमिकेत करिना दिसणार असून त्याचबरोबर स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या पण भूमिका असून वीरे ‍दी वेडिंग च्या शूटिंगसाठी सध्या सर्व अभिनेत्री राजधानी दिल्लीत पोहोचल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच करिना ती करीत असलेल्या जाहिरातीच्या संदर्भात‍ दिल्लीत गेली होती. त्यावेळी तिला बघण्यासाठी नऊ- दहा हजार लोकांची गर्दी झाली होती व त्यांना आवरताना नाकीनऊ आले होते. त्या गर्दीमुळे करिनाची कारदेखील पुढे सरकू शकत नव्हती. शेवटी कसेबसे तिला गर्दीतून बाहेर काढले गेले.
 
वीरे दी वेडिंग रोड-टिप फिल्म असून दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात बरेच आउटडोर शूटिंग होणार आहे. त्यामुळे या प्रसंगापासून धडा घेत चित्रपटाच्या टीमने करिना कपूरच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

सिस्टम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली वकिलाच्या भूमिकेत

मौनी रॉयने घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले, हात जोडून चाहत्यांना आवाहन केले

मूव्हर्स अँड शेकर्स' नंतर, शेखर सुमन 'शेखर टुनाईट' हा कार्यक्रम सादर करणार

पुढील लेख
Show comments