Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कतरिना आणि विक्की रिलेशनशिप

Webdunia
बुधवार, 9 जून 2021 (18:56 IST)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्यातील संबंधांच्या बातम्या बर्‍याचदा चर्चेत असतात. दोघेही  बर्‍याचदा एकत्र दिसतात. तथापि, या दोघांनी कधीही आपल्या नात्यावर कोणत्याही प्रकारचे शिक्के लावले नाहीत. त्याचवेळी आता एका अभिनेत्याने विक्की आणि कतरिनाच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
 
रिपोर्ट्सनुसार अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिना कैफच्या नात्याला दुजोरा दिला आणि सांगितले की दोघेही एकत्र आहेत. झूमच्या चॅट शो दरम्यान हर्षवर्धन यांना विचारले गेले होते की इंडस्ट्रीमधील कोणाचे रिलेशनशिप रिपोर्टस ते खरे मानतात की पीआर काम आहे ?
 
प्रत्युत्तरादाखल हर्षवर्धन म्हणाले, विकी आणि कतरिना एकत्र आहेत, हे खरं आहे. असे विचारण्यात त्याला त्रास होईल का असे विचारले असता? तर तो म्हणाला, 'मी हे सांगून अडचणीत सापडणार आहे काय?
 
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कुणीतरी कॅटरिना आणि विक्कीच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. नुकताच विक्कीला कॅटरिना कैफच्या घरी स्पॉट केले होते. विकीची कार कतरिनाच्या घराबाहेर अनेक तासांपर्यंत उभी होती. दुसरीकडे विकीच्या वाढदिवशी कतरिनाने फोटो सामायिक करुन शुभेच्छा दिल्या.
 
वर्क फ्रंटवर कतरिना कैफ लवकरच टायगर 3 आणि सूर्यावंशी सारख्या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे विक्की कौशल अश्वत्थामा, सरदार उधम सिंग आणि सॅम मानेकशॉ या चित्रपटात दिसणार आहेत.
 
 
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments