rashifal-2026

लतादीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Webdunia
रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (19:30 IST)
भारतरत्न आणि स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यावर रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. 
 
यावेळी लतादीदींचे हजारो चाहते आणि कुटुंबीय उपस्थित होते. लतादीदींच्या अंत्यसंस्काराला चित्रपट जगतापासून ते राजकीय आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर आले. यावेळी त्यांनी लतादीदींच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
 
लतादीदींच्या अंत्यविधीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती शिवाजी पार्कवर उपस्थित राहिले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेता शाहरूख खान, आमिर खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गीतकार जावेद अख्तर आणि इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहिले.
 
याआधी लतादीदींचं पार्थिव 12.15 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं.
 
त्यानंतर सैन्य दल, नौसेना, वायुसेने दलातील शिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली.
 
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

वादग्रस्त विधानाबद्दल हनी सिंगने मागितली माफी

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

धनुषच्या चाहत्यांना मिळाली पोंगलची मेजवानी, पुढच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

पार्टनर सोबत ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा; रमणीय सौंदर्याने प्रेम आणखीन फुलेल

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

पुढील लेख
Show comments