Marathi Biodata Maker

सोशल मीडियावरून गायब

Webdunia
मंगळवार, 18 जून 2019 (15:20 IST)
सेलिब्रिटी मंडळी प्रत्येक गोष्टीची अपडेट सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर करतात. काही कलाकार तर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सतत काही ना काही फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र कंगना राणावत या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरली आहे. कंगनाला सोशल मीडियाचा वापर करणे अजिबात आवडत नाही. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे म्हणजे आपला वेळ व्यर्थ घालणे असे ती मानते. त्यामुळे तिला इतर सेलिब्रेटींप्राणे सोशल मीडियावर आपली कोणतीही माहिती शेअर करायला आवडत नाही. विशेष म्हणजे कलाकार मंडळी सोशल मीडियावर आपली पब्लिसिटी करण्यासाठी मॅनेजर पीआर ठेवतात. मात्र कंगनाने आपले मॅनेजर आणि आपल्या टीमला सोशल मीडियाच्या कामापासून लांबच ठेवले आहे. कंगनाला सोशल मीडियाची सगळी माहिती तिची बहीण रंगोली देते. कारण रंगोलीला सतत अॅक्टिव्ह राहायला खूप आवडते. त्यामुळे सोशल मीडियावर कंगनाविषयी चर्चा होत असेल तर त्याची इत्थंभूत माहिती रंगोली कंगनाला देत असते. इतकेच नाही तर काही लोकं कंगनाच्या सोशल मीडियाचा वापर करत नसल्यामुळे गैर फायदाही घेतात. मात्र या सगळ्या गोष्टींचा कंगनाला जराही फरक पडत नाही. 'मणिकर्णिका-द-क्वीन ऑफ  झाँसी' सिनेमानंतर आता कंगना आणखी एका वेगळ्याच भूमिकेतून रसिकांच्याभेटीला येणार आहे. कबड्डीपटूच्या भूमिकेत कंगना झळकणार आहे. कंगनाचा एक फोटो समोर आला होता. यात ती कबड्डीचा सराव करत असल्याचे पाहायला मिळाले होते. 'पंगा' असे या सिनेमाचे नाव आहे. अश्विनी अय्यर तिवारी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments