Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

Webdunia
गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (16:04 IST)
' फिर हेरा फेरी' सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचं गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झालं. नीरज यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांच्या जुहूमधील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक झाला. त्यानंतर त्यांना  दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यावेळी ते कोमामध्ये गेल्याने, त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांनी त्यांना मुंबईतील आपल्या घरी आणलं होते. फिरोज नाडियावाला हेच त्यांची सर्व काळजी घेत होते. 

नीरज यांनी फिर हेरा फेरी, खिलाडी 420, सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रंगभूमीवरही ते सक्रिय होते. गुजराती भाषेतील ‘आफ्टरनून’ नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. नीरज हे एक उत्तम लेखक देखील होते. त्यांनी रंगीला, अकेले हम अकेले तुम, ताल, जोश, बदमाश, चोरी चोरी चुपके चुपके, आवारा पागल दिवाना सारख्या सिनेमांसाठी संवाद लेखन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हेराफेरीचा सीक्वेल हेराफेरी 3 वर काम करण्यास सुरुवात केली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय मुंबई

Saif Ali Khan: साऊथच्या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान दिसणार

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

पुढील लेख
Show comments