Marathi Biodata Maker

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख पक्की, मुंबईत होईल रिसेप्शन, जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी

Webdunia
गुरूवार, 21 जून 2018 (15:13 IST)
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाची तारीख पक्की झाल्या असल्याचे बर्‍याच मीडिया रिपोर्ट्सने दावा केला आहे. लग्नाची तारीख काही दिवसांअगोदर निश्चित झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे की  दोन तीन दिवसाअगोदर दीपिका पादुकोणने देखील रणवीर सिंहच्या फोटोवर 'mine' अर्थात 'मेरा' लिहून आपल्या संबंधाला जगासमोर कबुली दिली आहे.  
 
वृत्त असे आहे की रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचे लग्न 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोघांचे लग्न दक्षिण भारतीय पद्धतीने होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंब उदयपुरमध्ये डेस्टिनेशन वेंडिंग प्लान करत होते, पण ते काही शक्य झाले नाही. पण हे निश्चित आहे की विराट-अनुष्काप्रमाणे दीपिका-रणवीरदेखील मुंबईत रिसेप्शन पार्टी देतील.   
वर्षाच्या सुरुवातीत असे वृत्त आले होते की रणवीर-दीपिकाने लंडनमध्ये एक बंगला विकत घेतला आहे. त्यानंतर मार्चमध्ये वेबसाइट 'स्पॉटब्वॉय' ने दावा केला की दीपिका पादुकोण रणवीर सिंहच्या आई वडिलांसोबत लंडन गेली जेथे तिघांनी लग्नाची शॉपिंग सोबत केली. दीपिका पादुकोणजवळ सध्या एक चित्रपट आहे, ज्याची शूटिंग इरफान खानच्या आजारपणामुळे पुढे टाळण्यात आली आहे. तसेच रणवीर सिंह सध्या हैदराबादमध्ये चित्रपट 'सिम्हा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  
काही दिवसांअगोदर दीपिका आपल्या आईसोबत मुंबईच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये दागिने विकत घेण्यासाठी आली होती. दीपिका पादुकोणच्या जवळच्या लोकांनी सांगितले की जेव्हा रणवीर आणि दीपिका जेव्हा श्रीलंका गेले होते, तेव्हाच दोघांचा रोका देखील झाला होता. त्या वेळेस दोन्ही परिवाराचे सदस्य तेथे उपस्थित होते.   
 
रणवीर आणि दीपिका पादुकोण देखील विराट-अनुष्का प्रमाणे लग्नाच्या थीमवर एक विज्ञापन शूट करणार आहे. ज्या कंपनीसाठी 'विरुष्का'ने ऐड केला होता, त्याच ब्रांडचा प्रचार करताना 'दीपवीर' देखील दिसणार आहे. हे दोघेही सध्या लग्नाच्या वृत्ताचे पुष्टी ही करत नाही आणि खंडन ही नाही करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

Funny प्या रे देश....... वासियो...

महाराष्ट्रातील अशी ५ प्राचीन मंदिरे, जिथे उन्हाळ्यातही जाणवतो कमालीचा थंडावा!

रोनित रॉयच्या नावाने महिलांची सायबर फसवणूक, अभिनेत्याने चाहत्यांना सावध केले

चिरंजीवींनीने त्यांच्या मेगा १५८ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली

मराठवाड्याचे वैभव संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण

पुढील लेख
Show comments