Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान खान तब्बल 6 महिन्यानंतर गेला सिनेमाच्या शूटला

Salman Khan
Webdunia
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (08:08 IST)
बॉलिवूडचा दबंग सलमान खानने (Salman Khan) तब्बल साडेसहा महिन्यांनी शूटिंगला सुरुवात केली आहे. इतक्या महिन्यांनी सेटवर आल्यामुळे सलमान खानने आनंद व्यक्त केला आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साडेसहा महिन्यांनी सेटवर आल्यामुळे आनंद वाटतो आहे, असं कॅप्शनही सलमानने दिलं आहे.
 
कोरोनाच्या काळात सगळ्या सिनेमा आणि मालिकांचंचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे सलमानच्या 'राधे: यूअर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe Your Most Wanted Bhai) या सिनेमाचं शूटिंगही थांबवण्यात आलं होतं. आता सगळ्या नियमांचं पालन करून शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे.
 
सिनेमाच्या सेटवर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. शूट सुरू होण्याआधी कलाकारांसह सर्व टीमची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. राधे सिनेमामध्ये सलमानसोबत जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा असे दिग्गज कलाकारदेखील खास भूमिकेत दिसणार आहेत. राधे सिनेमासोबत किक-2, कभी ईद कभी दिवाली या प्रोजेक्टवरही सलमानचं काम सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भूल चुक माफचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार रावचे लग्न हळदीच्या सोहळ्यावर अडकले

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती

जर्मनीतील म्युनिकच्या रस्त्यावर अनुपम खेर गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल

चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक

सर्व पहा

नवीन

या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले

सिने क्षेत्रात विशेष योगदानासाठी अभिनेत्री काजोल, मुक्ताबर्वे, महेश मांजरेकर आणि अनुपम खेर यांना राज्यशासनाचे पुरस्कार जाहीर

जाट'मधील 'सॉरी बोल' या आयटम गाण्यासाठी उर्वशी रौतेलाने इतके मानधन घेतले

गुड फ्रायडे साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे सर्वोत्तम आहे

सनी देओलच्या 'जाट 2''ची घोषणा, प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिसणार अद्भुत शैली

पुढील लेख
Show comments