suvichar

बारामती आणि फलटण तालुक्यात दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2019 (16:21 IST)
बारामती आणि फलटण तालुक्यात सध्या अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाविषयी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. दबंग 3च्या निमित्तानं सलमान खान याच्यासह अरबाझ खान, सोनाक्षी सिन्हा, महेश मांजरेकर, दिग्दर्शक प्रभु देवा अशा दिग्गज कलाकारांनी चित्रीकरणासाठी हजेरी लावली आहे. 22 जुलैपर्यंत बारामतीसह फलटणमधील विविध भागात या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे.
 
बारामती तालुक्यातील होळ आणि भिकोबानगर येथे या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. यानिमित्ताने पहिल्यांदाच तालुक्यात बड्या अभिनेत्याच्या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. विशेष म्हणजे बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील राहुल जगताप या युवकाची ओपन जीपही या चित्रपटात वापरण्यात आली. त्याचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. राहुल जगताप यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी आपली ओपन जीप दिली आहे.
 
या चित्रपटाच्या कथानकाबद्दल प्रचंड गोपनीयता पाळण्यात आलीय. त्यामुळं चित्रीकरण स्थळी कुणालाही प्रवेश ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे चित्रपटाची दृश्ये चित्रित होत असताना कोणत्याही प्रकारचं (फोटो किंवा व्हिडीओ) करण्यास मज्जाव केला जातो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

Madhuri Dixit Birthday Special एकेकाळी पॅथॉलॉजिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले होते; मग 'धक-धक गर्ल' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली

Somnath Temple अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले

'रामायण'मधील रामाने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली, रणबीर कपूरने कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी केला

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'द स्किन डॉक्टर' यांना अटक केली; संजय कपूर यांच्या मृत्यूशी जोडले आहे प्रकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक अडकली लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments