Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बॅाईज ४’चे गावची ओढ लावणारे ‘गाव सुटंना’गाणे प्रदर्शित

Webdunia
गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (07:29 IST)
‘बॅाईज ४’मधील टायटल साँग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. अवधूत गुप्तेंसह सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडने गायलेल्या रॅप साँगला संगीतप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गाण्याला भरभरून प्रेम मिळत असतानाच आता ‘बॅाईज ४’मधील ‘गाव सुटंना’हे आपल्या मुळाकडे घेऊन जाणारे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या या सुरेख गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. तर प्रतिक लाड आणि रितुजावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे पद्मनाभ गायकवाड यांनी गायले आहे. जगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला, तरी त्याची नाळ आपल्या गावाशी, जन्मभूमीशी कायम जोडलेली असते, ते प्रेम कधीच कमी होत नाही. हे गाण्यातून प्रतिक सांगत आहे. आपल्या गावाचे सुंदर वर्णन तो या गाण्यातून करत आहे. तिथे रमत असतानाच आपल्या गावातील आठवणी तो मनात जपल्या असल्याचे सांगत आहे. परदेशात राहणाऱ्यांना आपल्या गावाची ओढ लावणारे हे गाणे आहे.
 
 संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, " `गाव सुटंना`हे मनाला भारावणारे गाणे आपल्या गावच्या आठवणी ताज्या करणारे आहे. आपल्या मातृभूमीपासून दूर परदेशात राहणाऱ्या प्रत्येकाला जवळचे वाटेल, असे हे गाणे आहे. प्रत्येक ओळीत भावना दडलेल्या आहेत. त्यामुळे रॅप साँगनंतर प्रेक्षकांना हे गाणेसुद्धा नक्कीच आवडेल.’’ सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

Netflix Down भारत आणि अमेरिकेत नेटफ्लिक्स डाऊन, हजारो यूजर्स नाराज

कांगुवा' अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक

शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही

रॅपर बादशाहचे नवीन गाणे मोरनी रिलीज

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पुढील लेख
Show comments