Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचे निधन

Webdunia
रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (10:46 IST)
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन झाले आहे. तबस्सुम या 78 वर्षांच्या होत्या. तबस्सुम यांना शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.आई तबस्सुम यांच्या निधनाबद्दल त्यांचा मुलगा होशांगने वृत्त दिले. त्यांनी सांगितले की काल रात्री 8:40 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने आईचे निधन झाले. त्यांनी आधिच कुटुंबियांना सांगितले होते की माझ्या मृत्यूची बातमी दोन दिवसांनंतर द्यावी. राजकुमार यांच्याप्रमाणे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. अंतिम संस्कार झाल्यानंतरच मी मीडियाला ही बातमी सांगितली.
 
1947 मध्ये तबस्सुमने बेबी तबस्सुम नावाने आपल्या करिअरची सुरुवात केली. ती एक प्रसिद्ध बालकलाकार असायची. एप्रिल 2021 मध्येही तबस्सुम गोविल यांच्या निधनाची अफवा समोर आली होती. त्यांनी स्वत: ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले होते. 
 
शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता त्यांना सलग दोन कार्डिअॅक अरेस्ट आले. 1947 साली बालकलाकार म्हणून काम सुरू केले होते.
 
त्यांचा फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम 1972-1993 या काळात भरपूर प्रसिद्ध झाला होता. लहानपणचे त्यांच्या भूमिका बेबी तबस्सुम नावाने प्रसिद्ध झाल्या होत्या. 
 
 गेल्या काही काळात त्या युट्यूबवर तबस्सुम टॉकिज नावाचा कार्यक्रमही चालवत होत्या. 
 
मेरा सुहाग, मंजधार, बारी बेहेन, बैजू बावरा अशा अनेक सिनेमांतून त्यांनी काम केले होते.  
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments