Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Competitive Exam साठी तयारी करताना लक्षात ठेव्या या 5 गोष्टी

Webdunia
सोमवार, 14 डिसेंबर 2020 (08:49 IST)
1 टाइम टेबल बनवा
सर्वात आधी आपल्याला एक चांगले नियोजन आणि टाइम टेबल बनवणे गरजेचे आहे. टाइम टेबल नेहमी आपल्या अभ्यासाच्या syllabus आणि जेवण्याचे आणि झोपण्याचे नित्यक्रमानुसारच बनवावे. टाइम टेबल नेहमी सहज बनवा जेणे करून आपल्याला ते हाताळणे सोपे जाईल.
 
2 नोट्स तयार करणे
विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी सर्व पुस्तके आपल्यासोबत घेऊन बसतात. त्यामुळे आधी कोणता विषय घ्या ह्याचा गोंधळ होतो. त्यासाठी जो विषय जास्त अवघड वाटतो त्या विषयाचे पुस्तक आधी घ्यावे आणि त्याचे नोट्स तयार करून घ्यावे. परीक्षेच्या वेळीस गोंधळ होणार नाही. पूर्वार्ध परीक्षेचे पेपर्स पण सोडवून बघावे.
 
3 शिस्त पाळा
अभ्यासाची सवय लावा आणि शिस्तीने टाइम टेबलानुसार अभ्यास करा. अभ्यासाला ओझे म्हणून करू नका. तर अभ्यास हसतं-खेळत आनंदाने करा.शिस्त पाळण्याच्या उपायांपैकी एक म्हणजे
पोमोडोरो पद्धत. यात वेळेचे नियोजन आणि डोक्याला ताजे तवाने करण्यासाठीची चांगली पद्धत आहे. ह्या पद्धतीत विद्यार्थी 50 मिनिटं अभ्यास केल्यावर 10 मिनिटाची विश्रांती घेतात आणि 25 मिनिटं अभ्यास केल्यावर 5 मिनिटे विश्रांती घेतात.
 
4 प्रलोभनांना भुलू नये
सोशल मीडिया सारखे प्रलोभन फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, सारख्या वेळ घेणार्‍या प्रलोभन पासून दूर राहावे. ज्यामुळे विद्यार्थीस भुरळ पडू शकते. पलंगावर अभ्यास न करता टेबल खुर्चीवर बसून अभ्यास करावे. लायब्रेरीत पण अभ्यास करू शकता. ज्यामुळे तुमचे अभ्यासातच लक्ष राहील.
 
5 टेस्ट पेपर्स / मॉर्क टेस्ट सोडवून बघा
मॉर्क टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढते. मागील वर्षाचे टेस्ट पेपर्स सोडवून बघा. परीक्षेचे नियोजन करा. आणि त्यानुसारचअभ्यास करा. ऑफलाईन टेस्ट सिरींज पण उपलब्ध असतात. तो पर्याय पण आपण निवडू शकता. ज्यामुळे आपणास सेंटरमध्ये असल्यासारखे वाटेल जेणे करून परीक्षेची भीती नाहीशी होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्याच्या त्वचेत हे बदल दिसून येतात.

हिवाळ्यात अशा प्रकारे लवंग खा, तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतील

वैवाहिक नाते पुन्हा ताजेतवाने आणि निरोगी करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

जातक कथा : रुरु मृग

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

पुढील लेख
Show comments