Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोट्यधीश होण्यासाठी तीन सोपे उपाय

Webdunia
कोणता व्यवसाय हिट राहील आणि कोणता फ्लॉप? हा प्रश्न लाखाचा असला तरी कॅनडा च्या रेयान होम्ससाठी हे काही रॉकेट साइंस नाही, ज्याची माहीत लावणे अवघड असेल.
 
रेयान होम्स एक गुंतवणूकदार आणि सोशल नेटवर्क अकाउंट मॅनेज करणाऱ्या वेबसाइट 'हूटसूट' चे संस्थापक आहे. त्याच्याप्रमाणे एक यशस्वी व्यवसायी होण्यासाठी कुठल्याही डिग्रीची गरज नाही. केवळ योजनेची गरज आहे ज्याने कोणत्या वेंचर मध्ये किती गुंतवणूक फायदेशीर सिद्ध होईल हे कळेल. ते यासाठी ट्रिपल 'T' फॉर्मूला देतात.
 
1. टॅलेंट
 
बिझनेस आयडिया आपल्याला खूप मिळतील परंतू त्याला लागू करणारे प्रतिभावान लाखांपैकी एखादे असतात. होम्सप्रमाणे याचे आकलन करताना ते सर्वात आधी बॉस आणि त्यांच्या टीमला बघतो. ते व्यवसायाप्रती समर्पित आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 
उद्योजकांसाठी सर्वात मोठा आव्हान, गुंतवणूकदारांचा पैसा शून्य ते अब्जापर्यंत नेणे असतं आणि यशस्वी होण्यासाठी आपला पूर्ण वेळ तसेच काम करण्याची पद्धत वेगळी असणे आवश्यक आहे.
 
होम्स म्हणतात की मोठे उद्योजक दुसर्‍यांना यासाठी पैसे मोजत नसून स्वत: समस्यांचे समाधान शोधतात. समाधान सापडत नाही तोपर्यंत ते आरामात करत नाही. उद्योजकांमध्ये काही करून दाखवण्याची इच्छा ही कंपनीची मूलभूत गरज आहे.
 
 
2.टेक्नॉलॉजी
 
होम्स म्हणतात टेक्नॉलॉजी ऐनवेळेवर विचार करण्यासाठी गोष्ट नाही. आपला व्यवसाय आयडिया तंत्रज्ञानाशी जुळलेलं असल्यास हे फार गरजेचे आहे. "कोडिंग आणि इंजिनियरिंग एका बिझनेस आयडिया एवढेच आवश्यक आहे.
 
'हूटसूट' संस्थापकानुसार एक व्यक्ती टेक्नॉलॉजी प्रती समर्पित असावा आणि दुसऱ्याचे लक्ष व्यवसायाकडे असावे ज्याने वेळेवर समाधान मिळू शकेल.
 
3. ट्रॅक्शन
 
ट्रॅक्शन अर्थात खेचणे किंवा आकर्षित करण्याची क्षमता. काय आपल्याकडे ग्राहक किंवा गुंतवणूकदार आहे? आपण किती पैसा कमावला? होम्सप्रमाणे आपल्याकडे ग्राहक आहे तो त्याची पैसा खर्च करण्याची इच्छा असणे याहून चांगले काय असू शकतं. याने गुंतवणूक वाढेल कारण 
 
जमिनी आयडियावर सट्टा लावणे कागदी आयडियावर सट्टा लावण्यापेक्षा अधिक सुरक्षित आहे.
 
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चांगली योजना असली पाहिजे. यश मिळवण्यासाठी असे सॉफ्टवेअर तयार करायला हवे जे कपंनीचे प्रॉडक्ट व्हायरल करून त्याच्या जाहिरातीवर लक्ष वेधून घे.
 
तरी होम्स स्वत: स्वीकारतात की ट्रिपल 'T' फॉर्मूला यशाचा अचूक उपाय नाही. कधीकधी योग्य टेक्नॉलॉजी, योग्य टीम आणि चांगले आयडिया असल्यावरही बिझनेस फ्लॉप होऊ शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गरोदरपणात पोहे खाल्ल्याने मिळतील हे 5 आरोग्य फायदे, जाणून घ्या

आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज करा ही योगासने, जाणून घ्या फायदे

अकबर-बिरबलची कहाणी : विहिरीचे पाणी

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

पुढील लेख
Show comments