Marathi Biodata Maker

Cucumber Mint Chutney Recipe अतिशय पाचक, थंड आणि चविष्ट; जेवणाची चव वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय

वेबदुनिया फीचर टीम
शुक्रवार, 1 मे 2026 (08:00 IST)
काकडी आणि पुदिना चटणी अतिशय पाचक, थंड आणि चविष्ट असते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाची चव वाढवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

साहित्य-
काकडी: १ मध्यम आकाराची (सोलून आणि किसून किंवा बारीक चिरून)
ताजी पुदिना पाने: १ कप
हिरव्या मिरच्या: २ ते ३ (तुमच्या आवडीनुसार)
ओलं खोबरं (किसलेलं): २ मोठे चमचे (पर्यायी)
लिंबाचा रस: १ चमचा
जिरे: १ छोटा चमचा
साखर: अर्धा छोटा चमचा (चवीसाठी)
मीठ: चवीनुसार

कृती
सर्वात आधी पुदिना स्वच्छ धुवून घ्या. काकडी किसली असेल तर त्याचे अतिरिक्त पाणी हलके दाबून काढून टाका. मिक्सरच्या भांड्यात पुदिना पाने, हिरव्या मिरच्या, जिरे, ओलं खोबरं, साखर आणि मीठ एकत्र करा. यामध्ये थोडे पाणी किंवा लिंबाचा रस घालून हे सर्व मिश्रण बारीक वाटून घ्या. आता तयार झालेल्या पुदिना चटणीमध्ये किसलेली काकडी मिसळा. जर तुम्हाला काकडी पूर्णपणे बारीक हवी असेल, तर तुम्ही ती पुदिन्यासोबत मिक्सरमध्येही फिरवू शकता. जर तुम्हाला आवडत असेल, तर वरून जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊ शकता.
ALSO READ: Summer Special चविष्ट आणि आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आवळा पुदिना चटणी
खास टिप्स- 
या चटणीमध्ये तुम्ही २ चमचे घट्ट दही घातल्यास ती अधिक क्रीमी आणि चविष्ट लागते.
ही चटणी पराठे, वडे किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी उत्तम लागते.
काकडीला पाणी सुटत असल्याने ही चटणी ताजी असतानाच खाणे उत्तम, फ्रीजमध्ये ठेवल्यास ती थोडी पातळ होऊ शकते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: सदाबहार दाक्षिणात्य मेजवानी; मऊ लुसलुशीत इडली आणि चविष्ट खोबऱ्याची चटणी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: आंबट-गोड आणि तिखट अशी चटपटीत सफरचंद चटणी रेसिपी
<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

प्रवासात नेण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ज्वारीचे धपाटे

या गोष्टी कारल्यासोबत चुकूनही खाऊ नका, आरोग्य समस्या उद्भवू शकतात

बीटेक प्रिंट आणि मीडिया टेक्नोलॉजी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

फक्त १० रुपयांमध्ये घरी नैसर्गिक गुलाबजल बनवा, या सोप्या टिप्स जाणून घ्या

मुलांचे केस पांढरे का होतात? पांढऱ्या केसांची समस्या होण्याची कारणे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments