Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन: देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित छत्रपती संभाजी महाराज

Webdunia
सोमवार, 16 जानेवारी 2023 (09:21 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा जगभर प्रसिद्ध आहेत, परंतु छत्रपती शिवाजीं प्रमाणेच त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी यांचेही जीवन देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे.छत्रपती संभाजी हे देखील पिता छत्रपती शिवाजींप्रमाणेच शौर्याचे आणि साहस चे प्रतीक होते.

लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत युद्धभूमीवर राहून छत्रपती संभाजी युद्धकलेत तसेच मुत्सद्देगिरीत पारंगत झाले होते. यामुळेच छत्रपती संभाजीं महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबासोबत सुमारे 120 युद्धे केली आणि प्रत्येक युद्धात औरंगजेबाला पराभवाला सामोरे जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 16 जानेवारीला या दिवशी छत्रपती संभाजींमहाराजांचा राज्याभिषेक झाला.

चला जाणून घेऊया संभाजी महाराजांच्या कारकिर्दीशी संबंधित काही माहिती 
छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर दुर्ग (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला. छत्रपतीसंभाजी फक्त दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे संगोपन त्यांची आजी जिजाबाई यांनी केले. आजी जिजाबाईंनी संभाजी राजांमध्ये शौर्य आणि पराक्रमाची बीजे पेरली होती असे मानले जाते.वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी शंभूराजांना काव्य, लिखाणाची आवड लागली. याच काळात ते संस्कृत भाषेतील पंडित बनले.

1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची तिसरी पत्नी सोयराबाई यांचा मुलगा राजाराम याला गादीवर बसवण्यात आले. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळ्यात कैद होते. राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी छत्रपती संभाजी यांना मिळताच त्यांनी पन्हाळा किल्ल्याचा किल्लेदार मारून किल्ला ताब्यात घेतला. यानंतर 18 जून 1680 रोजी छत्रपती संभाजींनी रायगड किल्लाही ताब्यात घेतला. राजाराम, त्याची पत्नी जानकी आणि आई सोयराबाई यांना अटक करण्यात आली. 

16 जानेवारी 1681 रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राज्याभिषेक झाला.वयाच्या 23 व्या वर्षी छत्रपती बनले. दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, मुघल सम्राट औरंगजेबाला वाटले की तो आता रायगड किल्ला सहज काबीज करेल. पण रायगडच्या सत्तेवर छत्रपती संभाजीमहाराज  बसताच औरंगजेबाने जेव्हा रायगडावर हल्ला केला तेव्हा तो छत्रपती संभाजीकडून पराभूत झाला. छत्रपती संभाजी महाराजांकडून  वारंवार पराभवानंतर, सम्राट औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीला अटक होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली. तो मुघलांना जाऊन सामील झाला.  छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र केशव राजकीय कार्यानिमित्त संगमेश्वरातून रायगडावर परत जात असताना संभाजींवर रागावलेल्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीं महाराजांना  आपल्या ताब्यात घेऊन क्रूरतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांची जीभ कापली आणि डोळे काढले.
 तुळापूरच्या नदीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे विकृत तुकडे फेकले असता काठावर राहणाऱ्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवण टाकून पूर्ण पध्दतीने अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते.
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments